अमरावती
इर्विन चौकात निदर्शने : प्रमाणिक कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी
अमरावती : काँग्रेसच्या पदवीधर सेलचे अध्यक्ष श्याम जगमोहन प्रजापती यांना काँग्रेसने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी द्यावी या लक्षवेधी मागणीसाठी अमरावती येथे निर्विन चौकात शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन करत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असला तरी महाविकास आघाडीचा उमेदवार मात्र ठरला नाही. अशातच आता महिला ब्रिगेड व अन्य पदवीधरांनी आज स्थानिक इर्विन चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर श्याम प्रजापती यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी या प्रमुख मागणीसाठी ईर्विन चौकात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. दरम्यान नाना पटोले यांनी प्रामाणिक कार्यकर्त्याला साथ द्यावी अशी मागणी उपस्थित करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील शेकडो महिला व पदवीधर प्रामुख्याने उपस्थित होते. नाना पटोले यांचा फोटो असलेले हंडी बॅनर महिला व युवकांनी हातात घेत नानाभाऊ कार्यकर्त्याला बळ द्या, एक संधी श्याम प्रजापतींना, नानाभाऊ अमरावतीत परिवर्तन करण्याची हीच ती वेळ, पदवीधरांच्या निवडणुकीत प्रजापतींना उमेदवारी द्या, सामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे हीच ती वेळ, अबकी बार शाम प्रजापती अशी जोरदार नारबाजी यावेळी करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अमरावती दौऱ्यावर असतानाच महिला शक्ती संघटना तसेच पाचही जिल्ह्यातून आलेल्या पदवीधरांनी लक्षवेधी आंदोलन केले. यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील कोडी ग्रामपंचायतचे सरपंच अंकुश गव्हाणकर, सहकारी संस्था कोळी येथील अध्यक्ष रवींद्र ठाकरे, युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव प्रतीक वनकर, काँग्रेसचे कार्यकर्ते प्रमोद नगराळे, खैरी ग्रामपंचायतचे सदस्य मारुती दंडारे, उपाध्यक्ष पंकज बेले, सहकारी संस्थेचे सदस्य नारायण हिवरकर, वसंत गोंदुरकर, हरिभाऊ बावणे, राजू हिवरे, अतुल महाले, राहुल आत्राम, राजू दाते, दयानंद नरांजे, सौ.सोनाली संजय वानखडे, पद्मा चंद्रकांत बोराडे, पद्मिनी दिलीप मोहोड, त्रिशला अजय तिवारी, स्नेहल सुरज खंडारे, इंदूबाई राजूभाऊ खंडारे, हर्षदा सुजित मोहोड, वंदना रंजित मोहोड, प्रणित अविनाश विधाते, संगिता महादेव चवरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
..
भाजपला शह देण्याची हीच ती वे ळ - उन्मेश पुरके
माझी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांचे चिरंजीव तथा यवतमाळ येथील युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उन्मेश वसंतराव पुरके यांनीही श्याम प्रजापती यांना पाठिंबा देत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रजापती यांना उमेदवारी देण्यासाठी निवेदन जारी केले आहे. त्या निवेदनानुसार पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याची गरज आहे. देशात विखार पसरून जातीय उनवाद निर्माण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला शह द्यायचा असेल तर खा राहुलजी गांधी यांच्या भूमिकेनुसार सामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे आग्रही मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उन्मेश पुरके, प्रतीक वनकर यांनी उपस्थित केली.
काँग्रेसने श्याम प्रजापति यांना उमेदवारी द्यावी यासाठी आता थेट महिला ब्रिगेडही रणांगणात उतरली आहे. अमरावती येथील महिला शक्ती संघटना यांनी आक्रमक होत काँग्रेसने प्रजापती यांना उमेदवारी द्यावी अन्यथा पुन्हा अमरावती पदवीधरची जागा ही भाजपच्या वाटेला जाईल. त्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी जबाबदार राहील असा इशारा या माध्यमातून देण्यात आला आहे.
---
0 Comments