Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार दिनी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांचा सत्कार


तालुक्यातील  पत्रकारांच्या वतीने "दर्पणकार" बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन.
    प्रतिनिधी मुर्तिजापूर

    मराठी पत्रकारितेचे जनक "दर्पणकार" बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दि.६ जानेवारी रोजी येथील भक्तीधाम मंदिर समता नगर  येथे पत्रकार दिन साजरा करण्यात येऊन आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन   करण्यात आले. तालुक्यातील आपल्या कार्यातून समाजात स्थान निर्माण करणारे पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार पत्रकार दिनाचे औचित्य साधून  करण्यात आला.यापूर्वी देखील पत्रकार दिनाच्या औचित्य साधून विविध उपक्रम राबविण्यात आलेले आहेत. 

  अभिवादन सभेचे अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम बोळे होते.तर डॉ.प्राध्यापक मनीषा यादव,दिपक अग्रवाल,प्रा.अविनाश बेलाडकर, प्रा.दिपक जोशी,सामाजिक कार्यकर्त्या योगिता वानखडे,ग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विलास नसले यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन व हारार्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.त्यानंतर जेष्ठ पत्रकार तथा मार्गदर्शक स्व.विकास सावरकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तविक ज्ञानेश देशपांडे यांनी केले.

          येथील सिटी टायक्वांडो क्लबच्या माध्यमातून खेळाडूंना विनामूल्य धडे देणारे व खेळाडू घडविणारे दिनेश श्रीवास यांचा याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत १४ खेळाडूंना विविध पदांवर नोकरी लागलेली आहे.सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे कुरुम येथील पत्रकार शफीखान पठाण सर्पमित्र म्हणून देखील ओळखले जातात.त्यांनी विविध जातीच्या सापांना सुरक्षित पकडून जीवनदान दिलेले आहे.त्यांचा देखील याप्रसंगी सत्कार करण्यात आला.तसेच ग्राम हातगाव येथील पत्रकार प्रकाश वानरे हे पंचायत समितीचे सदस्य असून त्यांचा देखील सत्कार करण्यात आला. तर नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुकीत ग्राम माना ग्रामपंचायतमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेले संतोष कोकणे यांचा देखील याप्रसंगी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डाँ.मनीषा यादव,दिपक अग्रवाल, निलेश मेहरे,उद्धव कोकणे,महादेव पाटील, सोहेल शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर पुरुषोत्तम बोळे यांनी आपले अध्यक्षीय विचार मांडले.अभिवादन सभेला विशाल नाईक,संजय उमक,ज्ञानेश देशपांडे,संतोष माने,नरेंद्र खवले, गजानन गवई, सुमित सोनोने,प्रकाश वानरे, प्रवीण ढगे,रवी शिंदे,विलास वानखडे,निलेश मेहरे,मोईज शेख,अँड.निलेश सुखसोहळे, उबेद चाऊब ,उमेश साखरे, आकाश जामनिक,पंकज सातपुते,श्याम काकडे, शफीखान पठाण,गौरव अग्रवाल,अनिल भेंडकर, पटवर्धन खंडारे,सोहेल शेख, उद्धव कोकणे,गोपाल ठक, संतोष कोकणे,उबेद चाऊस, अतुल नवघरे,नितीन इंगळे,दिनेश श्रीवास, महादेव पाटील,दिलीप तिहीले,जयप्रकाश रावत, संजय भडके,श्रीकांत डोईफोडे इत्यादी पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विलास नसले यांनी केले. तर आभार गोपाल ठक यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments