Ticker

6/recent/ticker-posts

संत श्री बीरबल नाथ महाराज यांचा यात्रेचे औचित्य साधून कोरोना योद्धांचा सन्मान

माजी राज्यमंत्री सुभाष रावजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते समाजसेविका ज्योती ठाकरे यांचा सन्मान

मंगरूळपीर | तालुक्यातील ग्राम देवत योग तपस्वी संत श्री बिरबलनाथ महाराज यांचा यात्रा महोत्सव हा  समाधी दिवसा पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात येतो  गोपाळकाला व महाप्रसादाने याची सांगता केल्या जाते  तालुक्यातील लाखों चे वर महिला व पुरूष भावीकासह बालगोपाल यांनी महाप्रसादाचा बारीतून लाभ घेतला यावेळी नाथ संप्रदाय व योग तपस्वी रूषीमुनी यांना संस्थान चे वतीने सुरूवातीला बिरबलनाथांचे जाग्रुत धुनी जवळ पंच पक्वान्न देऊन त्रुप्त केल्या नंतरच महाप्रसादाला यावेळी शहरातील आजी, म जी, नगराध्यक्ष तथा राजकीय दरम्यान आपली हजेरी लावली होती,  विविध क्षेत्रातील उल्लेखनीय  कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सुद्धा करण्यात आला माजी राज्यमंत्री सुभाष रावजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते समाजसेविका ज्योती ठाकरे यांचा शाल श्रीफळ व  सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी रामकुमार रघुवंशी, अविशकु रघुवंशी, सह ऊत्तम पाटील, तिवारी महाराज, वाडेकर साहेब, समाजसेविका वनमालाताई पेंढारकर, सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते कोरोना योद्धा म्हणून समाजसेविका ज्योती ठाकरे यांचा सन्मान करण्यात आला. कोरोना काळात यांनी उत्कृष्ट कार्य केल्यामुळे यांच्या संत श्री बिरबलनाथ महाराज यांच्या यात्रेचे औचित्य साधून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा संस्थांच्या वतीने सन्मान सोहळा संपन्न




Post a Comment

0 Comments