मंगरूळपीर ता २१:
येथील नवीन सोनखास येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभागृहात ता १९ रोजी येथील जिजाऊ महिला ब्रिगेडच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.
आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.सुनीताताई खिराडे,सरपंचा गट ग्रामपंचायत शहापूर, सोनखास, जांब तर
प्रमुख पाहुणे म्हणून गझाला खान माजी नगराध्यक्षा मंगरूपीर,
सौ.माधुरीताई व्यास,मुख्याध्यापिका प्रतिभा इंग्लिश स्कुल मंगरूपीर,
सौ.सीमाताई बाहेती अध्यक्षा राजस्थानी महिला मंडळ मंगरूळपीर या होत्या, सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दुग्धभिषेक करून पूजन करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध समाजपोगी कार्यक्रमाचे आयोजन जिजाऊ महिला ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले होते.कार्यक्रमासाठी मंगरूळपीर जिजाऊ ब्रिगेडच्या सौ.रोशनी दबडे, सौ.दिपलक्ष्मी येवले,सौ सुरेखा वानखडे,सौ राधा केदार,सौ पूजा डहाके, सौ वैशाली राठोड, सौ संगीताताई भोजने,सौ सुनीता राऊत,वैशाली गांजरे,सौ अनिता गावंडे,सौ मनोरमा लाहे,सौ,कुसुम राऊत,सौ आरती पेनोरे,सौ पुष्पा सानप सौ,पेनोरे सौ नीता गावंडे, सौ हर्षा भोजने, सौ नीता पाकधने सौ भोयर,सौ रेखा पन्नासे सौ.मंगला सोळंके,सौ.रुक्मिणी चव्हाण सौ उजवला राऊत सौ. वैशाली नंदनकर, सौ.शिल्पा मांढरे, सौ. ज्योती भुतडा , सौ.बाहेती. कु.पूणम . सौ.वार्डेकर,सौ.भोयर , सौ.डोंगरे, सौ .संगत यांचेसह महिलांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
तर कु संस्कृती गांजरे ,सृष्टी गांजरे, ऋतुजा ठाकरे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्र वर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचेआभार प्रदर्शन कु शिवानी पन्नासे हिने केले .
0 Comments