अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सचिदानंद भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज यांच्या गजरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत गजानन महाराज संस्थान ट्रस्ट हडको मंगलधाम कॉलनी मंगरूळपीर येथे श्री गजानन महाराज प्रगटदिन व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या कार्यक्रमाची
सुरुवात 7 /2/ 2023 रोजी मंगळवार ते 13/22023 सोमवार पर्यंत या पारायण सोहळ्याचे पठण करण्यात आले व्यासपीठावर ह. भ. प. श्री गोपाल महाराज राऊत राहणार अभयखेडा तालुका मानोरा यांच्या मधुर वाणीतून .
त्याचप्रमाणे दैनंदिन कार्यक्रम मंगळवार 7/2/2023 संत गजानन महाराज महिला भजनी मंडळ हुडको कॉलनी, बुधवार 8/2/2023 हनुमंत महिला भजनी मंडळ हडको कॉलनी,
गुरुवार 9/2/2023 ह .भ. प.कु. साक्षीताई लुंगे पारवा यांचे हरिकीर्तन, मानव जीवनात आल्यावर भक्ती कशा प्रकारची करावी व जीवनाचे सार्थक कसे करावे
कलियुगात तप, उपवास, व्रत, धारणा, ध्यान, समाधी कठीण आहे पण चालते- फिरते जागृत देव सर्वतीर्थमयी माता, सर्वदेवमयः पिता यांचा आदर-सत्कार करणे तर - सोपे आहे. म्हातारपणात आई-वडिलांसोबत उदंडपणे वागू नका, त्यांना वृद्धाश्रमात सोडू नका. चुकूनही कधी आपल्या आई-वडिलांचा तिरस्कार करू नका. सर्व काही मिळेल पण आई-वडील मिळणार नाहीत. किती दुःख सोसून आईने आपल्याला जन्म दिला, संगोपन केले, मोठे केले. त्यांचा आशीर्वाद घ्या, मंगलमय जीवन व्यतीत करा, तुमचे मंगल होईल ! मग तुमची मुलेसुद्धा तुमचा असाच आदर करतील. आई-वडिलांचे पूजन करा. आई- वडिलांप्रती मुलांच्या मनात आदर वाढावा यासाठी 'आई-वडिलांना विसरू नका' अशा मधुर वाणीतून हरिकीर्तन ,
शुक्रवार 10/2/2023 रुक्मिणी महिला भजनी मंडळ सोनखास, शनिवार 11/2/2023 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महिला भजनी मंडळ मंगल धाम, रविवार 12/2/2023 संत गजानन महाराज महिला भजनी मंडळ हडको कॉलनी, सोमवार 13/2/2023 ह. भ. प. श्री. गोपाल महाराज राऊत यांचे काल्याचे किर्तन व पारायणाची सांगता तसेच श्रीची महापूजा व अभिषेक पंचकोशीतील भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन या कार्यक्रमाचे आयोजक संत गजानन महाराज व्यवस्थापन समिती व गजानन महाराज महिला भजनी मंडळ हडको कॉलनी मंगरूळपीर यांच्यावतीने करण्यात आले होते

0 Comments