प्रतिनिधी माना ,उद्धव कोकणे
राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे यांची दिवसाढवळ्या त्यांच्या अंगावर गाडी चढवून हत्या करण्यात आल्याचा भयंकर प्रकार उघड झाला आहे.यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकशाहीला काळीमा फासणारा सदर प्रकार असून निकोप लोकशाही करिता ही अतिशय गंभीर बाब आहे.या घटनेची देशातील सर्वांनीच दखल घेतली पाहिजे.यासोबतच राज्यभरात वाढत असलेले हल्ले,खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे प्रकार या सर्व बाबींचा निषेध स्व.पी.एल.शिरसाठ प्रणित ग्रामीण पत्रकार संघ मुर्तिजापूर तालुक्याच्या वतीने नोंदविण्यात आला असून याबाबत राज्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेले आहे. उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत आज दि.१३ फेंबुवारी २०२३ ला पाठविण्यात आलेल्या निवेदनात सदर दहशत माजविणाऱ्या घटनांची तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे. बातमी प्रकाशित केल्याचा राग धरून शशिकांत सरीसे यांच्या दुचाकी गाडीला पंढरीनाथ आंबेरकर यांनी त्यांच्या गाडीने धडक दिली.यामध्ये शशिकांत सरिसे यांचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली. राज्यात गेल्या काही दिवसात पत्रकाराचा आवाज बंद करण्याचा किमान आठ घटना घडल्या आहे. हत्या झालेले पत्रकार शशिकांत वारीसे यांना शहीद घोषित करून त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा. अन्यथा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे.राज्यात पत्रकारांना मुक्तपणे आपले काम करण्यासारखे वातावरण तयार करण्याची सरकारची जबाबदारी आहे.त्या दृष्टीन प्रयत्न व्हावेत अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रा.दीपक जोशी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विलास नसले, जयप्रकाश रावत(जिमसं),अँड.निलेश सुखसोहळे,गौरव अग्रवाल,उबैद चाऊस,नितीन इंगळे,अतुल नवघरे,गजानन गवई,उध्दव कोकणे, विलास वानखडे,सुमित सोनोने,दिवाकर सोनोने, अंकुश अग्रवाल,पं.स.सदस्य प्रकाश वानरे, मिलींद जामनीक,संतोष माने,महादेव पाटील, अथरखान आदींची उपस्थिती होते.
0 Comments