मंगरूळपिर
:- तालुक्यातील धोत्रा फाट्यावर राष्ट्रीय महामार्गाला पडलेले मोठमोठी भगदाडे दुरूस्ती करण्यासाठी खोदुन ठेवण्यात आलेला सिमेंट रस्त्याचे पॅचेसमुळे दर दिवसाला अपघात होत असुन यामुळे प्रवाश्यांचे जिवीतहानी निश्चीत, मात्र राष्ट्रीय महामार्ग विभाग हे कोणत्याही हरकतीत नसुन उलट ठेकेदाराची पाठराखण करत असल्याने, जिवीतहानी झाल्यास ठेकेदारासह विभागाचे संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मणुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
आज सकाळी पाच वाजता सुमारास कारंजा वरून वाशीम कडे धान्य घेऊन जानारा ट्रक क्रं एम एच -ए यु १५०२ ह्याचा रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात वळणं घेत असतांना अपघात होऊन लाखोंचे नुकसान झाले, सुदैवाने यात जिवितहानी झाली नाही मात्र चालक व क्लीनर यांना दुखापत झाली,या राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी मोठमोठी खड्डे ठेकेदारा करवी खोदण्यात आले मात्र ती अद्याप दुरूस्ती केले नसल्याने अपघाताची मालीका दररोज सुरूच,या महामार्गाच्या कामात सुरूवाती पासुनच अनियमितता झाली असल्याने काम निक्रुष्ठ दर्जाचे झाले असल्याने या महामार्गावर मोठमोठ्या भेगा जाऊन खड्डे पडत आहे,तर दुरूस्तीचे नावाखाली दर दोन चार की.मी.वर अशी मोठमोठी खड्डे करून तर ठेवलें मात्र यास कुठलेच सुचना फलक लावण्यात आले नाही तर रात्री समयी वाहनचालकांना समजेल अशी व्यवस्था केली नाही त्यामुळे अपघाताची श्रुंखला वाढतच चालली,या खड्ड्यात जर छोटी चारचाकी वाहने थेट आदळली तर वाहनातील एकाचाही जिव वाचनार नाही,जर असे झाले तर ठेकेदारासह राष्ट्रीय महामार्ग विभाग वाशीम यांच्यावर सदोष मणुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व खोदलेले खड्डे तातडीने दुरुस्त करून प्रवाशांचा जिवीतहानी टाळावी अशी मागणी संबंधित अपघात ग्रस्त वाहन धारका सह नागरिक करतं आहे.
0 Comments