Ticker

6/recent/ticker-posts

केमिस्ट संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र; संजय राठोड पुन्हा अडचणीत

संजय राठोड यांनी आरोप फेटाळले

 अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यावेळी 'द महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन'ने त्यांच्यावर आरोप केले आहेत. राठोड यांच्या खात्यात कोटयवधीचा भ्रष्टाचार सुरू आहे. त्यांचे खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी, स्वीय सहाय्यक तसेच अन्य अधिकारी प्रत्येक कामासाठी प्रचंड पैसे मागतात, असा गंभीर आरोप असोसिएशनने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. राठोड यांच्या खात्याची चौकशी करावी अशी मागणीही त्यात करण्यात आली आहे.

कार्यालयात चाललंय तरी काय, असा सवाल 'द महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अॅण्ड इगिस्ट असोसिएशन'ने या पत्रात उपस्थित केला आहे. असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. औषध विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये छोटया-छोटया त्रुटी दाखवून त्यांच्यावर कारवाई करायची आणि ती थांबवण्यासाठी पैसे मागायचे असे प्रकार राठोड यांच्या खात्यात होतात, असा नावंदर यांचा आरोप आहे. दरम्यान, बोगस व बनावट औषध विक्री प्रकरणात या असोसिएशनमधील अनेकांवर आमच्या विभागाने कारवाई केली. या कारवायांना स्थगिती मिळावी म्हणून आपल्यावर दवाब आणण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे, असा दावा करत संजय राठोड यांनी आरोप फेटाळले आहेत.


संजय राठोड यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. अशा भ्रष्टाचाराला व भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्याला पाठीशी घालणार की त्याची मंत्रीपदावरून हकालपट्टी करणार हे जनतेसमोर जाहीर करा, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.

आजकाल मेडिकलवर प्रिंटेड भावाने ग्राहकांना मोजावे लागतात पैसे  प्रशासनाची उदासीनता याला अभयदान कुणाचे सरकार माय बापाने याही गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणे काळाची गरज

Post a Comment

0 Comments