Ticker

6/recent/ticker-posts

मनोरा पोलिसांचा दणका मुद्देमालासह आरोपी ताब्यात

पोलीस स्टेशन मानोरा जि. वाशिम येथे फिर्यादी रतलावत भिमला रतलावत नरख्या वय 39 वर्ष रा. पोषमगड्डा तांडा पोस्ट चदुरपल्ली वेलदंडा मंडळ ता. कल्वोकुर्ती जि. नागरकनुल तेलंगणा यांनी दिनांक 02/04/2023 रोजी दिलेल्या जबानी रिपोर्ट वरून पो.स्टे. ला अज्ञात आरोपीविरुद्ध अप क्र. 173/2023 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता, सदर चोरीमध्ये त्यांचा | डेल कंपनीचा जुना वापरता लॅपटॉप व चार्जर बॅगसह कि. 15000 रु. व असुस कंपनीचा जुना वापरता मोबाईल कि. 7000 रु. सहा पेनड्राईव्ह कि. 1200 रु., जुने वापरते सोनी कंपनीचे हेडफोन कि. 2000 रु. व नगदी 5500 रु. असा एकुन 30700 रु. चा मुद्देमाल चोरी गेला होता.
सदर गुन्ह्याचे तपास हा मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जगदीश पांडे सा. यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही सपोनि महेश कुचेकर सोबत पोहेकॉ । गणेश जाधव ब.नं. 839, पोहेकॉ मयुरेश तिवारी ब.नं. 1108, नापोकों बालाजी महल्ले ब.नं. 1177, नापोकॉ शरद राठोड ब.नं. 915, पोकों बंशी चव्हाण ब.नं. 16, पोकॉ चेतन भोयर बनं. 424 यांनी | केला असुन सदर गुन्हयाचे तपासात घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे व IMEI नंबर | ट्रेस करुन सदर आरोपीला कुपटा परीसरातुन शिताफिने ताब्यात घेवुन त्याचेजवळुन गुन्ह्यातील चोरी गेलेला डेल कंपनीचा लॅपटॉप, असुस कंपनीचा मोबाईल व एक पेनड्राईव्ह असा एकुन 22200 रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, सदर आरोपीला आज दिनांक 20/04/2023 रोजी अटक करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments