वाशिम-
मंगरूळपिर तालुका राजकारणातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या खरेदी विक्री संचालक पदाची निवडणूक नुकतीच पार पडली.यामध्ये आनंद पाटील राऊत हे मोठ्या मताधिक्य घेऊन संचालक म्हणून निवडून आले. राजकारणात युवा पिढीला सोबत घेऊन चालणारे आनंद पाटील परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये शेकडो निष्ठावंत कार्यकर्ते असून एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळावी म्हणून संचालक पदाचा राजीनामा देत असल्याचे युवा नेते आनंद पाटील राऊत यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
आनंद पाटील राऊत यांनी संचलकपदाचा राजीनामा दिल्याने मंगरूळपीर तालुक्यातील राजकारणात खळबळ उडाली असून एखादा कार्यकर्ता दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळावी म्हणून राजीनामा देतो हा खऱ्या अर्थाने मनाचा मोठेपणा असल्याची चर्चा जिल्ह्यात राजकारणात चर्चिल्या जात आहे.
याविषयी बोलताना आनंद पाटील राऊत म्हणाले की, पक्षात अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना संधी मिळावी म्हणून मी राजीनामा दिला असून तो राजीनामा मंजूर केला गेला असल्याचे सांगितले. परंतु यापुढे माझे राजकीय गुरू माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे साहेबच आहे आणि यापुढे मी फक्त त्याच्या नेतृत्वाखालील काम करत राहील असे आनंद पाटील राऊत यांनी सांगितले.
राजकारणातून आनंद पाटील संन्यास तर घेत नाहीत ना
0 Comments