गजानन राऊत , वनोजा
मंगरुळपिर तालुक्यातील वनोजा हे आदर्श व विकसनशील गाव म्हणून ओळखले जाते. तसेच ग्राम स्वच्छता अभियाना मध्ये तालुका, जिल्हा व विभागातून प्रथम क्रमांक मिळवणारे आणि राज्य स्तरावरही सहभागी झालेले गाव आहे. येथे तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असून ११ सदस्य संख्या आहे. मात्र आज रोजी ग्राम प्रशासन, ग्रामविकास अधिकारी यांच्या भोंगळ कारभारामुळे गाव विविध समस्यांनी ग्रासले आहे.
ग्रामस्वच्छता अभियानादरम्यान गावातील परिसर स्वच्छ राहावा या उद्देशाने शासनाने लाखो रुपये खर्च करून गोरगरीब नागरिकांन साठी सार्वजनिक शौचालय बांधले होते. त्यामागे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य मान चांगले राहावे, व परिसरात स्वच्छ रहावा हा दृष्टिकोन शासनाचा होता. परंतु याला ग्राम प्रशासनाने तिलांजली दिलेली दिसत आहे. गाव व गावातील परिसर हागणदारी मुक्त व्हावा हा मुख्य उद्देश शासनाचा होता. यासाठी गावातील प्रभागांमधील पाच ठिकाणी एकूण १८ सार्वजनिक शौचालय बांधकाम शासनाच्या निधीतून करण्यात आले होते.
मात्र ग्राम प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे सार्वजनिक शौचालययाची पूर्णपणे दुरावस्था झालेली दिसत आहे. काही ठिकाणी सार्वजनिक शौचालय कुलूप बंद आढळले, तर काही घाणीच्या साम्राज्याने बंद झालेले दिसले. शौचालयात वापरण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. पाण्याचे टाके असून त्यामध्ये पाणी नसून दगडे व कचरा आहे. तर काही ठिकाणी पाण्याची व्यवस्थाच नाही. काही शौचालया भोवती झाडे झुडपे वाढलेले आहे. त्यामुळे बरेच वर्षांपासून या शौचालयांची देखभाल व साफसफाई झालेली दिसत नाही. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता शौचालयाची दुरुस्ती साफसफाई व पाण्याची व्यवस्था करून, सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांकरिता उपलब्ध करून द्यावे, अशी ग्रामस्थांमधून मागणी होत आहे.
बॉक्स
महाराष्ट्र शासन स्वच्छ भारत मिशन २०१९-२०२० अंतर्गत ग्राम प्रशासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून काही वर्षापूर्वीच गावागतच दोन नवीन सार्वजनिक शौचालय बांधले आहे. त्या ठिकाणी पाणी व्यवस्था उपलब्ध आहे. मात्र तेही साफसफाई अभावी वापरण्यायोग्य दिसत नसून, शौचालयाचे काम निष्कृष्ट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे या कामात कुठेतरी पाणी मुरल्याचे सर्वसामान्य नागरिकात बोलल्या जात आहे.
0 Comments