Ticker

6/recent/ticker-posts

आदर्श ग्राम वनोजा येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे उन्हाळी शिबिराची यशस्वी सांगता


गजानन राऊत वनोजा 

मंगरुळपीर तालुक्यातील आदर्श ग्राम वनोजा येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक २१एप्रिल २०२३ रोजी उन्हाळी शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उप महाव्यवस्थापक मा. पंडागळे आणि प्रमुख पाहुणे म्हणून शाळा तपासणी अधिकारी मा.रोडे उपस्थित होते.
 या कार्यक्रमाकरिता गावातील प्रतिष्ठित नागरिक आदर्श वनोजा ग्रामचे सरपंच डॉ. श्रीराम मुखमाले, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गजानन राऊत, स्थानिक शाळा समिती सदस्य ज्ञानदेवराव राऊत उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी शिबिराविषयी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी इथून पुढं शिबिर दरवर्षी सुरू राहील याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कु.आर पी.कासलीकर यांनी मुलांना आश्वासन दिले की, कार्यक्रम हा इथून पुढे दरवर्षी सुरू राहील.तसेच आज रोजी विद्यालय दोन पाळीमध्ये सकाळी ७:३० ते रूपाली ११:४५ व दुपारी १२ ते सायंकाळी ५ असुन दोन्हीं पाळीवर मुख्याध्यापिका म्हणून लक्ष ठेवणे शक्य होत  नाही.व ग्रामीण भागातील बहुंताश पालक शेतकरी-शेतमजुर असुन पालक कामाकरीता कामावर गेल्यानंतर इतरत्र न भरकटता पाल्य विद्यालयात शिक्षणासाठी उपस्थित राहतील करीता विद्यालय एकाच पाळीमध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ५ या दरम्यान घेण्याबाबत आवश्यक त्या बाबींची पुर्तता करण्याची तयारी सुध्दा केली आहे.
 
शाळेतील विद्यार्थिनींनी आणि विद्यार्थ्यांनी शिबिराविषयी आपले मनोगत व्यक्त केले. गावातील प्रतिष्ठित नागरिक सुरेशराव राऊत,गंगादिप राऊत,गजानन राऊत आदींनी आपल्या मनोगतामधुन विद्यालयाची उत्तरोत्तर होणारी प्रगती विषयी समाधान व्यक्त करुन प्रमुख अतिथींकडे विद्यालया करीता संस्थेकडून विविध मागण्या केल्यात.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांनी विद्यालयाचे कामकाजाबाबत मुख्याध्यापीका व स्थानिक नांगरीकांशी सविस्तर चर्चा करुण आवश्यक त्या बाबींची पुर्तता करण्याची हमी दिली.
कार्यक्रमाचे संचालन सांगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन अवचार यांनी केले.
याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक ज्ञानदेवराव राऊत, सुरेशराव राऊत, गोवर्धन राऊत, यशवंत राऊत, गंगादीप राऊत, गजानन राऊत, माणिक बाईस्कर, राजेश इंगोले, सचिन राणे, शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक  एस पी नारळे, कु. बेलोकार, एस आर  राठोड, के व्ही घुगे, आर एस घुगे, डेरे, चपटे, सौ सोनटक्के, देशमुख, निखिल राठोड, झळके, मनवर, शिक्षकेतर कर्मचारी राठोड, श्रीनिवास घुगे शिवाजी आंधळे या सर्वांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments