मंगरूळपीर :-स्थानिक जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय मंगरूळपीर येथील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाकरिता राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना परीक्षा अर्थात एन. एम. एम. एस. 2022 - 23 या परीक्षेत एकूण 21 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी
.कु. हर्षिता गोविंद महाकाळ , सोहम शांताराम गोदमले ,
कु. फाल्गुनी राजेश गावंडे , अभिनव सुरेश हातोलकर ,
कु.साक्षी रविंद्र राठोड ,
कु.पृथ्वी कान्होजी भगत ,
कु.प्रांजली धम्मानंद भगत , कु.अनुष्का विनोद भुसारे ,
कु.प्रणाली अनिल भगत ,
कु.समिक्षा महेंद्र आडोळे ,
कु.मानसी दयानंद सोनवणे ,
शिलवंत जितेंद्र चुंबळे ,
उमेश अनुपाल मनवर हे 13 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यांची या राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड झालेली आहे. त्यांना जी.डी. मोरे , सुरज मनवर , देवांगणा लहामगे आदी शिक्षकवृंदांनी मार्गदर्शन केले.
त्याबद्दल त्यांचे दिनांक 01 मे 2023 रोजी महाराष्ट्र दिनी माननीय प्राचार्य एस.पी. टिक्कस,पर्यवेक्षक व्हि.पी. बाबरे, पर्यवेक्षिका कु. एम. एम. वैद्य व इतर शिक्षक वृंदाच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पालक प्रतिनिधी गोविंद महाकाळ , शांताराम गोदमले, तसेच संजय तेलंग , राजेश्वर गावंडे, प्रविण गणेकर , सुरज दवणे , किरण पाटील व बहूसंख्य पालक , शिक्षक शिक्षिका वृंदाची , तथा विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक राऊत यांनी तर आभारप्रदर्शन संजय तेलंग यांनी केले.
0 Comments