Ticker

6/recent/ticker-posts

ललवानी फाउंडेशन तर्फे स्व. ताराबाई ललवाणी , मनीत ललवाणी यांचा वाढदिवस व महाराष्ट्र दिन या शुभदिनाचे औचित्य साधून ललवाणी आराधना भवन, शितल जल व स्व.मोतीभाऊ कोटेचा यांच्या तैलचित्राचे अनावरण

 
भुसावळ - येथील ललवानी फाउंडेशन तर्फे कुऱ्हा पानाचे येथील ललवाणी फार्म या परिसरात जामनेर भुसावळ रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या पथिकांसाठी रणरणत्या उन्हात तहान भागावी म्हणून शितल जल उपलब्ध करून देण्यात आले आहे. 
त्याचप्रमाणे सर्व धर्मांच्या व जैन साधुसंतांच्या विहारांमध्ये विश्राम करण्यासाठी ललवाणी आराधना भवनाचे उदघाटन श्रीमती प .क.कोटेचा महिला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. डी.एम.ललवाणी यांच्या श्रद्धास्थानी असलेले दानशूर व्यक्तिमत्व स्व. मोती भाऊ कोटेचा यांच्या तैलचित्राचे गणेश मंदिरात अनावरण करण्यात आले. शितल जल आराधना भवन व  तैलचित्राचे अनावरण भुसावळचे लाडके आमदार संजय भाऊ सावकारे, जळगावतील प्रथीतयश विधीज्ञ अँड अकील इस्माईल, माजी नगराध्यक्ष नीळकंठ भारंबे, उद्योजक किरण महाजन, उद्योजक अनिल जैन, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष संजय भाऊ नाहाटा, टॅक्स कन्सल्टंट राजीव चोपडा, जैन चातुर्मास समितीचे अध्यक्ष प्रशांत कोटेचा, ललवाणी परिवाराचे अर्ध्वयु मदनलालजी ललवाणी, कुऱ्हा येथील संघपती  नंदलालजी छाजेड ,यांच्या उपस्थितीत  संपन्न झाले. 
याप्रसंगी संजयभाऊ सावकारे यांनी या सर्व उपक्रमाचे कौतुक करून ललवाणी परिवार करीत असलेल्या चांगल्या उपक्रमाला सदिच्छा दिल्या.  तसेच स्व. मोतीभाऊ कोटेचा यांच्या कार्याला उजाळा देऊन निष्ठावान व त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कार्यरत असलेल्या व त्यांना श्रद्धांजली म्हणुन आज प्रत्यक्ष रूपात त्यांच्या तैलचित्राला मूर्त स्वरूप देऊन त्यांच्या प्रति असलेल्या आपल्या भावनांन प्रा.ललवाणी यांनी   मुर्त स्वरुप दिल्याचे प्रतीपादन केले.तसेच  जामनेर रोड वरून येणाऱ्या जाणाऱ्या पथिकांसाठी शितल जल उपलब्ध करून देऊन एक चांगला पायंडा पाडला व त्यांची तहान भागवली .तसेच विशेष करून मला आनंद वाटतो की जैन साधु- साध्वींसाठी प्रशस्त असे व त्यांना लाभदायक ठरेल असे आराधना भवन उभारून सामाजिक ,धार्मिक , व आपल्या गाँड फादर विषयी क्रुतज्ञता चे कार्य केले असल्याचे सावकारे यांनी नमुद केले. या प्रसंगी सावकारे हे भावुक झाले होते त्यांनी सह्रुदयाने केलेल्या कथनामुळे भाऊंच्या आठवणीने सर्वांचे डोळे पाणावले.कारण आजच्या कलीयुगात व्यक्ती गरज सरो वैद्य मरो अश्या प्रव्रुत्तीच्या असतात .मात्र प्रा.ललवाणी यांनी आपल्यावरील ऊपकाराची सदैव जाण ठेवली हे क्वचीतच दिसते असे नमुद करुन त्यांच्या हस्ते हे तैलचित्र करण्यार्‍या आशिया बुक अवार्ड विजेत्या चित्रकार रचना महाजन यांचा सन्मान करण्यात आला. तैलचित्र पाहुन सर्व ऊपस्थीत मंत्रमुग्ध झाले.
अँडवोकेट अकील ईस्माईल यांनी प्रा. ललवाणी यांच्या  संबंधांना उजाळा देऊन एक चांगल व्यक्तिमत्व म्हणुन आम्हाला मोठा बंधू  मिळाला व कौटुंबीक संबंधाना ऊजाळा दिला. ललवानी फाउंडेशनने केलेल्या या कार्याचे कौतुक करुन समाजात अशा संस्था विरळ असल्याचे नमुद केले. तसेच ललवाणी  यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्याकडून उत्तरोत्तर अशीच सेवा घडत राहो असे नमूद केले. तसेच या परीवाराने आज केलेले हे  तिन ही उपक्रम वाखाणण्या सारखे आहे असे सांगीतले.स्व.मोतीभाऊ हे खांदेशातील हिरे पारखणारे जोहरी होते.प्रा.डाँ.ललवाणी यांनी कधीच त्यांच्या विश्वासाला तडा जावु दिला नाही.मध्येच सावकारे यांनी अकीलभाई सारख्या हुशार वकीलाची मदत कधिही न घेण्याचा प्रसंग आमच्यावर येवो व अकीलभाई ईतके असख्खलीत मराठी बोलतात,  असे सांगुन हास्याची लहर ऊपस्थीतात निर्माण केली.
 
आमदार सावकारे यांचा सत्कार  मदनलाल  ललवाणी , निळकंठ भारंबे यांचा सत्कार नलीन ललवाणी, किरण महाजन यांचा सत्कार अनिल कोटेचा, राजीव चोपडा यांचा सत्कार संजय नाहाटा , अँड अकिल इस्माईल यांचा सत्कार आमदार संजयजी सावकारे,कुऱ्हा संघपती नंदलाल छाजेड यांचा सत्कार मानस ललवाणी यांनी केला.  याप्रसंगी बहुसंख्येने ललवाणी परिवारावर प्रेम करणारे अनेक प्रेमी, दर्दी परिवार उपस्थित होता. 
भुसावळ येथील अभ्यासू श्राविका सौ .ज्योती गादिया, सौ.लता सिसोदिया ,सौ,शोभा छाजेड ,सौ.रिटा छेडा,सौ.मधु लोढा ,सौ.अनिता साखला,सौ.छाया कटारिया यांनी आराधना भवन ललवाणी परिवाराने निर्माण करून एक चांगली धार्मिक सुविधा ऊपलब्ध करुन दिल्याची  प्रतिक्रिया व्यक्त केली.के नारखेडे विद्यालयाचे माजी मुख्यध्यापक प्रा.जि.एम.महाजन,शिक्षीका वंदना भिरुड,तलाठी वैशाली मुन,स्टेट बँक अधिकारी नितीन छेडा,ऊद्योजक बाबुशेठ चोरडिया,केमिस्ट अतुल ताथेड,मनिष चोरडिया,सुनिल साखला,रामजी बंब, जवाहर डेअरी चे संचालक हेमंत पाटिल यांनी मोतीभाऊ यांच्या तैलचित्राबाबत च्या निर्णयाचे कौतुक केले. भुसावळकर समाजसेवी कमलेश निकुंभे,भरत कोळी,किरण बोलके,कुर्‍हेकर जगदिश बारी,चंद्रशेखर शिंदे,बशिरभाई,,जामनेरकर प्रमोद बोरा,प्रकाश बोरसे,पुंडलिक चौधरी  यांनी शितल जल ऊपक्रमाबाबत धन्यता व्यक्त केली. कार्यक्रमापुर्वी नवकार महामंत्राचा जाप करण्यात आला.

Post a Comment

0 Comments