Ticker

6/recent/ticker-posts

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त प्रतिज्ञा

वाशिम,दि.२१ 
 दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाच्या निमित्ताने निवासी उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण यांनी आज २१ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना प्रतिज्ञा दिली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार,गजानन   कु-हाडे,शितल पावडे,गगन आडे, किरीष बंगारे व इतर कर्मचारी उपस्थित होते
         आम्ही,भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तिनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहोत.आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करु,तसेच मानवी जिवीत मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु, अशी शपथ यावेळी उपस्थित सर्वांनी घेतली. 
                       0000

Post a Comment

0 Comments