१६ जोडप्यांचा मेळाव्यात सहभाग.
मंगरूळपीर वाशिम जिल्ह्यामध्ये नांदते पश्चिम महाराष्ट्र अशी आगळीवेगळी ओळख असलेल्या आजही अस्सल मराठी बोलीचे ओळखले जाणारे गाव दस्तापुर या गावां मध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून हुंडा पद्धतीला बगल देऊन सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा कायम राखत दि.४ मे रोजी सकाळी ११ वाजता माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे व तालुक्यातील राजकीय पुढारी तसेच महाराष्ट्रातून आलेल्या अनेक कानाकोपऱ्यातून मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला.
दस्तापुर गावामध्ये हरित क्रांती घडवून आणणारे व समाजाला योग्य मार्गदर्शक म्हणून लाभलेले माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी वधू-वरांना शुभेच्छा देत असताना असे म्हणाले की दस्तापुर या ठिकाणी अनेक वर्षापासून परंपरेला फाटा देत आधुनिक युगामध्ये वाटचाल करत सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा कायम राखत त्यांनी श्रम पैसा वेळ या सर्व गोष्टीचा मेळ करून जनसामान्यांची बचत कशी होईल यासाठी प्रयत्न करून सामूहिक विवाह सोहळा हा ऐतिहासिक क्षण असेल असे म्हणाले.
गेल्या अनेक वर्षापासून वाशिम जिल्ह्यामध्ये वास्तव्यास असलेल्या आदर्श ग्राम दस्तापुर यांनी या जिल्ह्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबवून आदर्श निर्माण केल्याचे चित्र सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने पहावयास मिळाले असे उद्गार महाराष्ट्रातून आलेल्या अनेक कोपऱ्यातून मान्यवरांनी काढले.
या सामूहिक विवाह सोहळा मध्ये दस्तापुर,कासोळा,पुणे, सावरगाव ,बंगला मध्य प्रदेशातून खंडवा बुरहानपुर ,व इतर ठिकाणाहून संबंध जुळलेल्या १६ वधू-वरांनी विवाह सोहळ्या मध्ये सहभाग नोंदविला होता
संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष रमेश मुंजे हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक चळवळी मध्ये काम करत असल्याने ते गेल्या २५ वर्षांपासून वधू-वरांना मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ प्रतिमा भेट देत असतात.
सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा कायम राहण्याची गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामीण युवक मंडळ व राजकीय मंडळी हे अथक परिश्रम घेऊन सामूहिक विवाह सोहळा यशस्वी पार पाडतात म्हणून या मेळाव्यामध्ये अहोरात्र मेहनत घेणाऱ्यांची स्तुती सुद्धा उपस्थित मान्यवरांनी केली .
या कार्यक्रमासाठी माजी सरपंच नामदेवराव गळवे, ग्रामपंचायत सदस्य मुकेश मुंजे, पोलीस पाटील वसंत मुंजे, माजी सरपंच विश्वनाथ आटपाळकर, उपसरपंच आनंद आटपाळकर, तंटामुक्ती अध्यक्ष श्रीमंत खांडेकर, माजी मुख्याध्यापक के .टी. मुंजे सर भगवान चौरे, गोपाल खांडेकर, भागाप्पा शिंदे, शिवराज आटपाळकर, राजाभाऊ गोडसे, दर्याप्पा गोडसे, पांडुरंग मुंजे, मधुकर मुंजे, दत्ता आटपाळकर, मंगेश गेंड, राजू शिंदे, सागर आटपाळकर, व पुणे येथील वाहन चालक , ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य, ग्रामीण युवक मंडळ, गावातील प्रतिष्ठित नागरिक इत्यादींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले
या कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ पत्रकार रमेश भाऊ मुंजे यांनी केले पंचकोशीतील व महाराष्ट्रातील मान्यवरांनी जेवणाचा आस्वाद घेतला

0 Comments