Ticker

6/recent/ticker-posts

सामाजीक न्यायाच्या योजनांबाबत लाभार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये - लॉ. वसंतराव धाडवे


वाशिम - सामाजीक न्याय विभागाच्या कोणत्याही योजना बंद झालेल्या किंवा केलेल्या नाहीत. बार्टी प्रशिक्षणाच्या सर्व योजना सुरु असून लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जेष्ठ समाजसेवी लॉ. वसंतराव धाडवे यांनी केले आहे.
    सामाजिक न्याय विभागाच्या सर्व  योजना चालू आहेत, बार्टीच्या प्रशिक्षणाच्या  व इतर चालु असलेल्या कोणत्याही योजना बंद करण्यात आलेल्या नाहीत, मात्र राज्यातील सर्व सामान्य जनतेमध्ये/समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी खोटी व दिशाभूल करणारी माहिती ठराविक संघटना व लोकांकडून दिली जात असून आंदोलने करण्यात येत आहेत. सचिव, सामाजिक न्याय विभाग यांच्या विरोधात निवेदने दिले जात आहेत. त्याचप्रमाणे विविध प्रसार माध्यमातून देखील जनतेची दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. विभागाचे सचिव श्री सुमंत भांगे यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करण्यात येत आहेत. हे सर्व आरोप सचिव सुमंत भांगे यांनी फेटाळले असून त्यात कोणत्याही स्वरूपाचे तथ्य नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे. खोटी व सामाजिक न्याय विभागाची बदनामी करणारी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करण्यात येत असल्याचा खुलासा सचिव श्री सुमंत भांगे यांनी केला आहे. सामाजिक न्याय विभागात वर्षानूवर्षे मक्तेदारी निर्माण करणारे ठेकेदार, भोजन पुरवठा करणारे ठेकेदार तसेच विविध प्रशिक्षणाच्या सेवा देणार्‍या संस्था, यांचे करार संपुष्टात आले असल्याने तसेच विभागाने केलेल्या स्थानिक स्तरावरील चौकशीत भोजन ठेकेदार दोषी आढळल्याने त्यांचा भोजन ठेका रद्द करुन त्यांच्याविरुद्ध काही ठिकाणी गुन्हे दाखल करून त्यांना काळ्यायादीत टाकण्याची कार्यवाही प्रस्तावित केल्याने या ठेकेदारांकडून विभागाची व सचिवांची बदनामी करुन प्रतिमा मलिन करण्याची मोहीम राबविण्यात येत असून सामाजीक न्याय विभागाच्या योजना बंद झाल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र या अफवा खोट्या व निराधार असून सामाजीक न्याय विभागाच्या कोणत्याही योजना बंद झालेल्या नसुन सुरळीत सुरु आहेत. त्यामुळे या अफवांवर नागरीकांनी विश्वास न ठेवता योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन लॉ. वसंतराव धाडवे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments