Ticker

6/recent/ticker-posts

भूमी अभिलेख कार्यालयाच्या कार्यप्रणालीमुळे शेतकरी अडचणीत


मानोरा :- शहर आणि तालुक्यातील कृषी,अकृषी तथा व्यावसायिक शासकीय व खाजगी जागांच्या मोजणीसाठी महसूल विभागाअंतर्गत प्रत्येक तालुक्याला असलेले भूमी अभिलेख कार्यालये हे असून अडचण नसून खोळंबा मानोरा येथे विशेषतः शेतकऱ्यांच्या वाढत्या येरझारांवरून पुढे येत आहे.
मानोरा तालुक्यामध्ये 78,177 हेक्टर एकूण भौगोलिक क्षेत्र शेतीशी संबंधित असून पैकी यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये 53 845 हेक्टर शेतकऱ्यांनी शेती वहीती खाली आणली होती.
औद्योगिक दृष्ट्या गडचिरोली जिल्ह्यातील मागास तालुक्याची बरोबरी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुका करीत असल्यामुळे अल्पभूधारक शेतकरी असो अथवा विस्तीर्ण शेती क्षेत्र बाळगून असलेले शेतकरी या शेतकऱ्यांचे शेती संबंधित तंटे निस्तरण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाची मदत छोट्या आणि मोठ्या शेतकऱ्यांना घ्याव्या लागत असतात. 
  भूमी अभिलेख कार्यालयाला सध्या नियमीत भूमी अभिलेख ऊपअधीक्षक वर्षभरापासून लाभलेले असून यापूर्वी प्रभाऱ्यांवर कारभार चालत होता. असे असतानाही भूमि अभिलेख कार्यालयाचे कामकाज पहिल्याप्रमाणेच कासवा पेक्षाही संथ गतीने चालत असल्याने तालुक्यातील असंख्य  शेतकऱ्यांची प्रकरणे लालफितीत अडकल्याने या कार्यालयाच्या येरझारा मारणाऱ्या शेतकऱ्यांच्या उद्विग्न प्रतिक्रियांवरून समोर येत आहे. 
 विवादास्पद शेतीची प्रकरणे अथवा भूखंड,निवासी प्लॉट व शासकीय जमिनीच्या मोजमापासाठी भूमी अभिलेख कार्यालयाचे दस्तावेज प्रमाण मानले जातात.भूमी अभिलेख कार्यालयाची तातडीची अति तातडीची व इतर प्रकारची शुल्क भरूनही भरलेल्या शुल्काच्या निर्धारित कालावधीमध्ये कधीच प्रकरणे निकाली निघत नसल्याने असंख्य गरजू नागरिकांना व विशेषतः शेतकऱ्यांना अनेक वेळा येरझारा या कार्यालयात घालाव्या लागत असल्याने येथील प्रशासनाने आपल्या कार्यालयाची संथगती त्यागून गरजू शेतकऱ्यांना व इतरही नागरिकांची प्रकरणे वेळेवर  हातावेगळे करण्यासंदर्भात शहर व तालुक्यातील नागरिकांकडून मागणी होत आहे.

मोजणी लांबत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेती कसण्यामध्ये अडचणी येत असल्याने भूमी अभिलेख कार्यालयाने निर्धारित वेळेमध्ये प्रकरणे निकाली काढून तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

Post a Comment

0 Comments