मंगरूळपीर :
बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालय मंगळसा येथे एका छोटेखानी कार्यक्रमांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत स्तरावर कार्य करणाऱ्या महिलांचा तसेच सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बाल कल्याण विभाग महाराष्ट्र शासन ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार २०२३-२०२४ करीता मंगळ्सा येथील सुवर्णा मारुती पाकधणे, पुष्पा सतीश वानखडे व मूर्तिजापूर येथून सिमा विनोद डेरे ,चित्रा गोपाल चाबूकस्वार , रेखा रवी चव्हाण, पुष्पा खंडारे, कल्पना खंडारकर
झाडगाव येथून उषाताई रामदास बेलखेडे, सारिका गोपाल राऊत यांना शाल ,श्रीफळ,पूष्पगुच्छ व ५००/- रुपये रोख आणि ट्रॉफी व सन्मानपत्र ज्यावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेद्रजी फडणविस व महिला बालकल्याण मंत्री मंगल प्रसाद लोढा यांच्या स्वाक्षऱ्या असलेले सन्मानपत्र देऊन मंगळ्सा ग्रामपंचायतीच्या सरपंचा सौ शोभाताई पाकधणे यांच्या हस्ते गौरविण्यात आलेत .यावेळी ग्रामसेवक मुकेश सुरडकर लिपिक अरुण राऊत, रामेश्वर ठाकरे, सौ रजनीताई अभ्यंकर कॉम्प्युटर ऑपरेटर तसेच अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका यांची उपस्थिती होती.
0 Comments