Ticker

6/recent/ticker-posts

माहितीचा अधिकार जनतेला मिळालेले ब्रह्मास्त्र!... गजानन हरणे.

  
अकोला...........युवा विकास आणि विकासासाठी युवा अनुभव  शिक्षा केंद्र यांच्यावतीने विदर्भ स्तरीय युवा नेतृत्व विकास अभ्यासक्रम कार्यशाळा दिनांक २ ते ११ जून 2023 पर्यंत आयोजित 
करण्यात आली आहे. 
या कार्यशाळेमध्ये धर्मनिरपेक्ष, लोकशाही ,लिंगभावातील न्याय, सामाजिक न्याय ,प्रामाणिकपणा, उत्तरदायित्व, पर्यावरण सुरक्षा, समजप्रतिष्ठा आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन होऊन युवकांमध्ये नेतृत्व गुण निर्माण करण्याचे काम युवा अनुभव शिक्षा केंद्राच्या वतीने होत आहे. या कार्यशाळाला गजानन हरणे समाजसेवक तथा  संयोजक निर्भय बनो जण  आंदोलन यांनी एक दिवशीय माहिती अधिकार कार्यशाळेला धामणगाव देव येथे मार्गदर्शन करताना माहितीचा अधिकार हा जनतेला मिळालेले ब्रह्मस्थ असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यशाळेला विदर्भातील अकराही जिल्ह्याचे युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित राहून माहितीचा अधिकार सविस्तर समजून घेतला. हा कायदा कसा वापरायचा ,याचा उपयोग कुठे करायचा, देश आणि समाजात या कायद्यामुळे गतिशीलता व पारदर्शपणा कसा येऊ शकतो शासनाच्या कामात लोकांचा सहभाग कसा वाढू शकतो. होत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा कसा बसू शकतो व या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिक खासदार आमदार कसा झालेला आहे. याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन या कार्यशाळेला समाजसेवक गजानन हरणे यांनी केले व हा कायदा युवकांना समजून सांगून त्याचे प्रॅक्टिकल सुद्धा या कार्यशाळेमध्ये करून घेतले. युवकांच्या प्रश्न उत्तराने या सत्राचा समारोप करण्यात आला.                                        

Post a Comment

0 Comments