राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मागण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात तक्रार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे. ट्विटच्या माध्यमातून 'तुमचा देखील दाभोळकर करू' अशी ● धमकी देण्यात आली आहे.
ट्विटर हँडलरवर कारवाई करा,
'राजकारण 'महाराष्ट्राचं' या नावाच्या खात्यावरुन अशा प्रकारची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार करण्यासाठी गेलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना माहिती दिली.
राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे विरोधी पक्षनेते मा. ना. श्री. अजितदादा पवार व आपल्या नेत्या खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांनी अभिप्रेत असणारी संघटना पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी, पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी वेळोवेळी सहकार्य केले तळागळातील जनसामान्यांना न्याय देण्याची कार्य करणारे आमचे नेते यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या वर कठोर कारवाई करा अशी मागणी व राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो त्याचबरोबर पवार साहेब यांना तात्काळ राज्य सरकारने वाढीव सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी करत असल्याचे प्रतिपादन ज्योतीताई ठाकरे यांनी केले
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रबादी महिला काँग्रेस पाटींच्या विद्याताई चव्हाण महिला अध्यक्षा वाशिम जिल्ह्यातील सौ.
ज्योतीताई मनोजराव ठाकरे
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रबादी महिला काँग्रेस पाटींच्या प्रदेश सचिव, मंगरूळपीर पंचायत समिती सदस्य सौ. मीनाताई सचिन राऊत व इत्यादी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments