Ticker

6/recent/ticker-posts

वनोजा येथील श्री शिवाजी हायस्कूल चा उत्कृष्ट निकाल



वनोजा

नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला.  त्यामध्ये श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वनोजा  या विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल लागलेला आहे. विद्यालयाचा निकाल 94.54 % लागला असून, प्राविण्य श्रेणीमध्ये 10 विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये 20 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीमध्ये 20 विद्यार्थी  व तृतीय श्रेणीमध्ये 02 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

यामध्ये कु. श्रुतिका पुरुषोत्तम राऊत  90.60% गुण घेऊन विद्यालयामधून ती प्रथम आली आहे. कु. दिव्या मोहन राऊत 88.40% गुण घेऊन विद्यालयामधून द्वितीय आली आहे तर कु. शिवानी गजानन राऊत 88.20% गुण घेऊन विद्यालयामधून तृतीय आली आहे. तसेच कु. प्राची श्रीकृष्ण राऊत 87.80% , कु. नूतन विठ्ठल गणेशपुरे 86.60%, कु. गौरी रामदास राऊत 86.20%, कु. शिवानी भारत ठाकरे 78.40%, विकी शंकर चव्हाण 77.60%, कु. श्रेया गणेश अंदुले 76.40%, कु. महेश्वरी दिलीप राऊत 75.40%  या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे.
 
गुणवंत विद्यार्थ्यांचे  स्थानिक शाळा समितीचे निमंत्रित सदस्य डॉ. मारोतराव राऊत, ज्ञानदेवराव राऊत, मंगुसिंगजी पवार, गंगादीप राऊत, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री गजानन राऊत यांनी अभिनंदन केले. शाळेच्या उत्कृष्ट निकालाबाबत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments