सचिन राणे दि. ५ जून
दि. ५ जुन सोमवार रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कारंजा वन विभाग, गो ग्रीन फाउंडेशन व कारंजा रक्तदान चळवळ यांच्य संयुक्त सहभागाने सायकल रॅली व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामधे स्थानिक स्व प्रकाशदादा डहाके वन पर्यटन केंद्र येथे, सर्वप्रथम सायकल ट्रॅक चे उदघाटन अभिजित वायकोस उपवनसंरक्षक वाशिम वनविभाग यांचे हस्ते करण्यात आले. या मध्ये वन विभागाकडून सायकलिंग साठी नवीन सायकल्स सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या.
यानंतर वनपर्यटन केंद्रातील निसर्ग निर्वचन संकुल सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती अभिजित वायकोस उपवनसंरक्षक वाशिम वनविभाग, वाशिम पंचायत समिती गटविकास अधिकारी पडघन, गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने, कारंजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आधारसींग सोनोने, कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे, वाशीम वनपरिक्षेत्र अधिकारी प्रेम तिडके, कारंजा डॉ. असोसिएशन चे अध्यक्ष डॉ अजय कांत, गो ग्रीन फाउंडेशन चे डॉ. पद्माकर मिसाळ तसेच सर्व धर्म समभाव आपत्कालीन संस्थेचे अध्यक्ष श्याम भाऊ सवाई व्यासपीठावर उपस्थिती होते.
यामधे सर्व प्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारंजा आर एफ ओ अमित शिंदे यांनी करून आयोजित कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. त्यानंतर डॉ. अजय कांत यांनी पर्यावरण जागृती सोबतच रक्तदानाचे महत्व विषद केले. तसेच कारंजा वन विभागातील सर्व वन कर्मचारी यांना त्यांचे पर्यावरणाप्रती समर्पण लक्षात घेता, मोफत औषधोपचार करण्याचे सुद्धा जाहीर केले. बिइओ श्रीकांत माने यांनी पर्यावरण पूरक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग किती आवश्यक आहे. हे सांगून तसा आदेश शाळांना देण्याचे आश्वासन यावेळी दिले.
ठाणेदार आधारसींग सोनोने यांनी त्यांची पर्यावरण बद्दलची आस्था आपल्या व्यक्तिगत जीवनातील काही अनुभव सांगून व्यक्त केली. सर्व धर्म समभाव चे श्याम भाऊ सवाई यांनी अपघातात जखमी झालेल्या पक्षी व प्राण्यांसाठी उपचार केंद्र सुरू करण्याची सूचना आपल्या मनोगतात व्यक्त केली. गट विकास अधिकारी पडघण यांनी पर्यावरण, निसर्ग, झाडे याबद्दल सविस्तर संबोधन केले.
शेवटी प्रमुख उपस्थितीत असलेले अभिजित वायकोस यांनी पर्यावरण दिनानमित्त घेतलेल्या या कार्यक्रमाचे आयोजक वन विभाग, गो ग्रीन फाउंडेशन, कारंजा रक्तदान चळवळ यांचे अभिनंदन व कौतुक केले. तसेच सर्वांच्या सूचना व प्रस्ताव यावर विचार करून त्वरित त्याची अंमबजावणीही करू अशी ग्वाही सर्वांना दिली. वाशिम जिल्ह्यात कारंजा येथे निसर्ग प्रेमी संस्था संघटना या अतिशय सक्रिय असून अश्या उपक्रमात अग्रेसर असतात असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यानंतर वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या ज्या मुलांनी दहावी बारावी परीक्षेत प्रावीण्य मिळविले त्यांचा त्यांच्या पालकासहित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्याच सोबत रक्त दात्यांचे सुद्धा प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. त्यात प्रामुख्याने, सौ स्नेहल भारती व सौ स्वप्ना अक्षय लोटे या दोन महिलांनी सुद्धा रक्तदान केले. यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते निसर्ग निर्वचन संकुल सभागृह परिसरात वृक्ष रोपण सुद्धा करण्यात आले.
रक्तदान शिबिरात स्वतः अभिजित वायकोस उपवनसंरक्षक वाशिम यांनी रक्तदान करून सर्वांचा उत्साह वाढवला. आर एफ ओ अमित शिंदे तसेच अनेक वन विभागातील कर्मचारी यांनी मिळून एकूण 25 लोकांनी रक्तदान केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन गो ग्रीन फाउंडेशन सदस्य आशिष बंड यांनी केले. याप्रसंगी कारंजा वन विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, गो ग्रीन फाउंडेशन व कारंजा रक्तदान चळवळ चे सर्व सदस्य तसेच निसर्ग प्रेमी मंडळी मोठा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरिता किशोर सरनाईक, गौरव करे, राजू शिंदे, अविनाश पवार, गजानन देवढे, गणेश जामकर, रुपेश जामकर, गजानन थेर, अण्णा भगत, गोलू पुरोहित कु. कोहर, घटाळे आदी वनकर्मचारी तर कारंजा रक्तदान चळवळ चे सर्वेसर्वा प्रज्वल गुलालकरी, यांनी परिश्रम घेतले.
0 Comments