चालक फोन उचलत नव्हता. त्यामुळे कंपनीचे मालक अमरनाथ गोविंद संग्राम हे काय झाले पाहण्यासाठी म्हणुन बंगळुरूहून नागपुरात आले. तर तो कंटेनर रिकामा होता आणि ड्रायव्हर आणि क्लिनर दोघांचे फोनही बंद होते. अखेर त्यांनी पारडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अनिल इंगोले आणि सायबर युनिटचे बलराम जाडोकार यांचे पथक तयार करण्यात आले. टोल बूथवर बसवलेले सीसीटीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक सर्व्हीलेन्सने पाळत ठेवल्याने आरोपी गुजरातच्या सुरतजवळील बारडोली येथे गेल्याचे उघड झाले.हरीश हाजर खान आणि मोहम्मद मुस्तफा धन्ना खान यांनी पारडी येथे असलेल्या दुसऱ्या कंटेनरमध्ये माल टाकला. हा कंटेनर गुजरातमधून शाहिद सफी मोहम्मद खान (२४, गुजरात) आणि आसिफ मसूद खान (२७, नहू, हरियाणा) यांनी आणला होता. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, कळमना येथील ट्रक चोरीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे पोलीस उपनिरीक्षक दीपक ठाकरे हे पथकासह सुरतमध्ये होते. सुदर्शन यांनी तत्काळ आरोपींची माहिती देऊन त्यांना अटक करण्याचे निर्देश दिले. बारडोली पोलिसांच्या मदतीने ठाकरे यांच्या पथकाने तेथे जाऊन चार आरोपींना अटक केली.या आंतरराज्य टोळीचे गुजरातमधील अन्य सदस्यही होते. या टोळीतील सदस्यांनी अल्पावधीत ४५ लाख रुपयांचे लॅपटॉप आणि टीव्ही मॉनिटर विकल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपींकडून ट्रकसह ९ कोटी ८ लाखांचा माल जप्त केला आहे. या टोळीने यापूर्वीही असे गुन्हे केल्याची शंका व्यक्त होत असून या संबंधित अधिक तपासात करण्यात येत आहे.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments