वाशिम खबर आज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
त्यामुळे आता नवीन मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार याची चर्चा रंगू लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाचा विस्तार झालाच तर तो छोटेखानी असेल. यामध्ये जास्तीत जास्त १० जणांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल.
सध्याच्या घडीला शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात सध्या एकनाथ शिंदे गटासह आणि भाजपचे २० मंत्री आहेत. यामध्ये सर्व कॅबिनेट मंत्री आहेत. विधानसभेच्या एकूण सदस्यांची संख्या लक्षात घेता आणखी २३ जणांना मंत्रिपद दिले जावू शकते. तीन मंत्रिपदे रिक्त ठेवून विस्तारात २० जणांना संधी दिली जाईल असा तर्क होता. मात्र, आता अशी माहिती समोर येत आहे, की भाजपच्या सहा व शिंदे गटाच्या चौघांना सामावून घेतले जाईल.् भाजपचे चार जण कॅबिनेट मंत्री तर दोन जण हे राज्यमंत्री असतील, असं सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजप श्रेष्ठींनी हिरवा कंदील दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी कालच्या भेटीत या दोघांनी याबाबतही चर्चा केली.
दोन ते तीन मंत्रिपदे रिक्त ठेवून २० मंत्रिपदे भरावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मात्र,अद्याप मोठ्या विस्ताराला पक्षश्रेष्ठींनी अनुमती दिली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात कोणत्या नेत्याची वर्णी लागणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे.
0 Comments