Ticker

6/recent/ticker-posts

महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांची शहीद अमोल गोरेंच्या परिवाराला मदत

वाशिम दि.12 
 शहीद जवान अमोल गोरे यांच्या परिवाराकरीता जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन मदत म्हणून गोळा केलेली 50 हजार रुपये रोख रक्कम आज 12 जून रोजी जिल्हाधिकारी यांचे कक्षात जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांच्या हस्ते शहीद अमोल गोरे यांचे वडील तान्हाजी गोरे व आई मंदाबाई गोरे यांना देण्यात आली. 
      यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे,अधीक्षक राहुल वानखडे, सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत,नायब तहसीलदार कैलास देवळे,सुनील घोरे, कर्मचारी संघटना अध्यक्ष तात्यासाहेब नवघरे,कार्याध्यक्ष माधवराव शिंदे, अतुल देशमुख,धर्मराज चव्हाण तसेच अन्य महसूल विभागातील कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments