मोर्चात सहभागी
होण्याचे आवाहन
कृषी प्रधान देशात कष्टकरी, शेतकरी वर्ग अजूनही मुलभूत गरजा व सुविधांपासून वंचित आहे. एका दाण्याचे शंभर दाणे करणारा शेतकरी कष्टकरी या देशातील पोशिंद्याला राहायला घर नाही तर शेत करण्यासाठी संरक्षण नाही. वारंवार अस्मानी संकट येतात तरीही याचा गांभीर्याने विचार केला जात नाही सर्व बाबींचा विचार करून हा लढा अधिक तिव्र करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील कष्टकरी शेतमजूर, शेतकरी दीनदलीत दुर्बल घटकातील हजारों बांधवांनी
प्रहार जनशक्तीचे गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे आमदार बच्चुभाऊ कडू यांचे नेतृत्वात ९ ऑगष्ट क्रांती दिनी सकाळी ११ वाजता गाडगेबाबा मंदीर अमरावती ते विभागीय कार्यालय अमरावती येथील जन एल्गार मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे वाशिम जिल्ह्याचे दत्ता महाराज पाकधने पाटील यांनी वाशिम जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या हक्काच्या जन एल्गार लढाईसाठी या आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. या जन एल्गार मोर्चामधील निवेदनातील मागण्या या प्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतातील पेरणी ते कापणी पर्यंतची सर्व कामे म.प्रा.रो.ह.योजने अंतर्गत करण्यात यावी, कुळा मातीचे अतिक्रमथ वास्तव
करणारे, पालघर, ताडपत्रीमध्ये निवास करणारे, घरेलू कामगार, बेघरांना घरकुल देण्यासाठी स्वतंत्र घरकुल योजना करण्यात यावी, बांधकाम मजूरांप्रमाणे शेतकरी व भूमीहीन शेतमजूर व घरेलु कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्यात यावे, प्रकल्पग्रस्तांना 25 लक्ष अनुदान, 20 लक्ष बिनव्याजी कर्ज किंवा कुटुंबातील एक व्यक्तींना नौकरी देण्यात यावी, वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थीक नुकसान व होणारी जिवीतहानी यासाठी भरघोस मदत देण्यात यावी, वनप्राण्यांचा बंदोबस्त करावा, बांधकाम कामगार नोंदणी झालेल्या बोगस कामगारांची नोंदनी रद्द करावी, कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करावे, औदोगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना पूर्व कल्पना दिल्या शिवाय कामावरुन कमी करु नये, या सर्व मागण्या संदर्भात शासनाने सहानुभूतीपूर्वक,
गांभीयनि विचार करून सदर मागण्या मंजूर करून न्याय देण्यात यावा अन्यथा आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये विधान भवनावर लाखोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात येईल. या प्रमुख मागण्यांसाठी वाशिम जिल्ह्यातील कष्टकरी शेतकरी प्रहारचे आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
0 Comments