Ticker

6/recent/ticker-posts

न.प.चा अजब गजब कारभार मूलभूत सुविधा बंद कागदपत्री विकास काम चालू , मंगरूळपीर शहर मात्र भक्कास

          बंद पडलेली हापसी

शहर प्रतिनिधी इरफान शेख

मंगरूळपीर नगर परिषदेने विकासाच्या नावावर हजारो कोटीचे कामे करूनही शहर भकास झाले आहे. नागरिकांना मुलभूत समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. 
मंगरूळपीर शहरातील अशोक नगर येथे अनेक कामे सुरू आहे या कामाची  जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस.यांनी स्पोर्ट चौकशी करावी म्हणजे मोठा भ्रष्टाचार बाहेर येण्याची शकता अशी चर्चा नागरिकात जोर धरत आहे मंगरूळपीर येथील अभियंताने आपला खिसा कसा गरम करता येईल असे काम केले आहे की काय. अशोक नगर मध्ये  पुलाचे काम असो, रोडचे असो की नालीचे काम , एम बी प्रमाणे करण्यात आलेल्या कामाचा मेळच लागणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाची स्थळ निरीक्षण केल्यावर न.प. च्या अधिकाऱ्याने कुठे पाणी मुरवले हे दिसून येईल. यावरून असे दिसून येते अनेक वेळा कागदोपत्री रस्ते करूनही नागरिकांचे जीवनच खड्डयात गेले आहे. घंटा गाडीच्या तंट्याने जीवनाचा कचरा झाला आहे. आठ दिवसाआड गढुळ पाण्याने आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात सध्या ही खूप प्रश्न आहेत.
 नागरिकांकडून हजारो रुपयांची पठाणी वसुली करून त्यांच्या माथी मारलेल्या नळाच्या मिटरला आठवड्यातून एक दिवस येणारे दूषित पाणी,  संपूर्ण शहरातील स्वच्छतागृहाची अवस्था, धन धन दांडग्यांची असलेली अतिक्रमण, असे अनेक विषय पुढाकाराने घेवून राजकारण्याने श्रेयवादासाठी का होईना अपूर्ण राहीलेले कामे पुर्ण करावे आणि शहरासोबतच •  विकासाचा मार्ग काढावा  
घरकूल योजना असो, स्वच्छ भारत योजना असो असे अनेक आश्वासनाचे गांजर देवून विजयाची पुंगी वाजविली असली यालाच म्हणाव का शासन आपल्या दारी. तरी कुठे झाला विकास, शहर. झाले भकास, नगरसेवक व लोकप्रतिनिधी झकास अशी परिस्थिती मंगरूळपीर शहरांचीही झाली आहे.
स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव विकासाचा मात्र अवहेलना उत्सव हे सध्याच्या परिस्थितीत दिसत आहे.
खरडून गेलेले रोडचे काम
थातूरमातूर करण्यात आलेले रस्त्याचे 
अशोक नगर मध्ये थातूरमातूर करण्यात आलेले काम वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

Post a Comment

0 Comments