कारंजा (लाड) : (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : कारंजा येथील जुने जाणते राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते तथा खेर्डा (काळी) येथील माजी सरपंच प्रदिप विनायकराव वानखडे हे बालपणा पासून तर आजता गायत आयुष्यभर राष्ट्रीय कॉंग्रेसशी निष्ठावंत राहिलेले, एकमेव सच्चे प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून वाशिम जिल्ह्यात ओळखले जातात.त्यांनी आयुष्यभर समाजसेवा हे ब्रिद हृदयाशी बाळगून कारंजा शहरातील कितीतरी गोरगरीब,तळागाळातील लोकांची छोटी मोठी कामे केलीत.परंतु गेल्या दोन अडीच वर्षांपासून त्यांच्या कुटूंबावर दुःखाचे डोंगर कोसळत आहेत.प्रदिप वानखडे यांच्या कुटूंबात आई सुधाबाई वडील विनायकराव,भाऊ अनुक्रमे संजय,डॉ विनय,प्रदिप व प्रशांत असे चार भाऊ आणि एक बहीण असे कुटूंब असतांना, गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले भाऊ डॉ विनय वानखडे यांचे दि 8 मे 2021 रोजी हृदयविकाराने अचानक निधन झाले.त्यानंतर वडील जि.प.प्रा.म.शाळा वाईचे माजी मुख्याध्यापक स्व. विनायकराव वानखडे यांचे मागील वर्षी दि 23 जुलै 2022 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले तर आता दि 3 जुलै 2023 रोजी प्रदिप वानखडे यांचे सर्वात मोठे बंधू संजय वानखडे यांचे हृदयविकारानेच आकस्मिक निधन झाले.त्यांच्या कुटूंबावरील लागोपाठ होत असलेल्या दुःखद आघाताने प्रदिप वानखडे यांच्या मित्र मंडळीकडून हळहळ व्यक्त केल्या जात असून ही दुःखद वार्ता त्यांचे जुन्या काळचे जीवलग मित्र तथा सध्या अमरावती विधानपरिषद मतदार संघाचे शिक्षक आमदार असलेल्या अँड किरणरावजी सरनाईक यांना कळताच,स्वतः आजारी असतांनाही शिक्षक आमदार अँड किरणराव सरनाईक तथा त्यांचे सहकारी काँग्रेस कार्यकर्ते प्रा.डॉ. कृष्णराव बाप्पू देशमुख यांनी तत्परतेने, बुधवारी दि. 5 जुलै 2023 रोजी, सायंकाळी 08:00 वाजता, कारंजा येथील प्रदिप वानखडे यांच्या निवासस्थानी धावती भेट देऊन,श्रीमती सुधाताई वानखडे आणि प्रदिप वानखडे यांचे सांत्वन केले.
व त्यांना धिर दिला.यावेळी त्यांचे मित्र,विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे,जय हो स्वच्छ भारत लघुचित्रपटाचे निर्माते डॉ.इम्तियाज लुलानिया,रोमील लाठीया,पत्रकार कैलाश हांडे,कृ.उ.बा.स.चे माजी संचालक सुरेशराव पोले,काँग्रेस नेते दिलीपराव भोजराज उपस्थित होते. 'स्वतः आजारी असतांनाही वानखडे कुटूंबाला,वेळ न दवडता लागलीच भेट दिल्याबद्दल' संजय कडोळे यांनी त्यांचे आभार मानले.त्यांच्या भेटीमुळे 'आमचे आमदार असावे तर असे.' अशी चर्चा उपस्थितांमध्ये होत होती.असे वृत्त पत्रकार विजय पाटील खंडार यांनी कळवीले आहे.
0 Comments