वाशिम : पावसाळ्याप्रारंभी दिड महिना हुलकावणी देणाऱ्या पावसाने गत चार दिवसांपासून धुवाधार बॅटिंग केली. परिणामी, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर पावसाने दडी मारल्यामुळे काही भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अतिवृष्ट्री व पेरण्या उलटल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी भाजपाचे जिल्हा महामंत्री नागेश घोपे यांनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
जिल्हाभरात यंदा उशिरा पावसाचे आगमन झाले. त्यामुळे स्वाभाविकच पेरण्यांना उशिर झाला. पेरण्या आटोपल्या ना आटोपल्या तोच पावसाने पून्हा दडी मारली. परिणामी काही भागातील पेरण्या उलटल्या असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले.शेतकरी या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच चार दिवसापासून
मंगरूळपीर व वाशिम तालुक्यासह जिल्ह्यातील काही गावांमध्ये अतिवृष्ट्री झाली आहे. काही गावांमध्ये तर चक्क ढगफुटीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी शेतकरी हवालदिल झालेत. झालेल्या नुकसानीचे तात्काळ सर्व्हेक्षण करून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री नागेश घोपे यांनी केली आहे. या संदर्भात घोपे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री लोकनेते ना.देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.
बॉक्स
@ शेतकऱ्यांनो चिंता नसावी ; शासन आपल्या पाठीशी
राज्यात यंदा पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. परंतु या सर्व परिस्थितीवर शासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात येणार नसल्याचा शब्द दस्तुरखुद्द उपमुख्यंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे. त्यामुळे अतिवृष्ट्रीच्या प्रकोपाने किंवा दुबार पेरण्यांच्या संकटाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही. शासन त्यांच्या पाठीशी खंबिरपणाने उभे राहील असा आशावाद भाजपाचे जिल्हा महामंत्री नागेश घोपे यांनी व्यक्त केला.
बॉक्स
@ उपमुख्यमंत्री देवेंद्रजींचे आदेश ; प्रशासकिय यंत्रणा अलर्ट
0 Comments