Ticker

6/recent/ticker-posts

मोझरी येथे श्री वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या विशेष शिबिर पथकाचे उद्घाटन


मंगरूळपीर :
येथील श्री वसंतराव नाईक कला व श्री अमरसिंग नाईक वाणिज्य महाविद्यालय, मंगरूळपीर यांच्या वतीने दत्तक ग्राम मोझरी येथे दि. २५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिर पथकाचे उद्घाटन गुरुवारी (दि.२५) उत्साहात पार पडले.

अमर शिक्षण प्रसारक शिक्षण संस्थेद्वारे संचलित महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. आ. अ. राठोड, श्री. पी. पी. इंगोले, डॉ. एल. के. करांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वडगुले यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी मोझरी येथील लघुउद्योजक श्री. बाळासाहेब राठोड यांच्या हस्ते रिबीन कापून शिबिर पथकाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. सूत्रसंचालन प्रा. एस. एन. टापरे (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, +2 स्तर) यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा. डॉ. पी. आर. तायडे (रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी) यांनी मांडले.

यावेळी श्री. साहेबराव खिराडे, ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रवेश खाडे, सरपंच श्री. नितीनभाऊ सोनोने (ग्रा.पं. मोझरी/पिंपरी-खरबी), उपसरपंच श्री. रुपेशभाऊ ठाकरे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. सरपंच नितीनभाऊ सोनोने यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासोबत स्वच्छतेवर भर देण्याचे आवाहन केले. उद्घाटक श्री. बाळासाहेब राठोड यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही काळाची गरज असून युवक घडविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना प्राचार्य डॉ. एस. एम. वडगुले यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्व स्पष्ट केले.

कार्यक्रमाला डॉ. सुनील राठोड, प्रा. पी. एन. जाधव (कनिष्ठ महाविद्यालय प्रभारी), प्रा. डी. बी. जाधव, डॉ. व्ही. डी. कोवे, डॉ. एन. बी. मठपती, डॉ. प्रकाश शृंगारे, डॉ. सुनील ढाकूलकर, डॉ. एस. एल. हुरणे, डॉ. विश्वनाथ हिस्सल, डॉ. डी. जी. राठोड, प्रा. निलेश अवझाडे, प्रा. स्वाती चापके, प्रा. रवीना राठोड यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य श्री. राजूभाऊ भगत, श्री. ओमप्रकाश इंगोले, श्रीमती काजल संदीप सोनोने (आशा वर्कर), श्रीमती जयमाला बेलखेडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. एस. एन. टापरेडॉ. पी. आर. तायडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments