वाशिम दि.२१ सार्वजनिक बांधकाममंत्री दादाजी भूसे यांनी आज २१ जूलै रोजी नागपूर -मुंबई हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची पाहणी करतांना मालेगाव तालुक्यातील वारंगी येथील समृध्दी महामार्गावरील बेस कॅम्पला भेट दिली.
भेटीदरम्यान श्री.भूसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले,समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या अपघातांमध्ये भौतिक दृष्टिकोन पाहिला तर समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या सध्या तरी कमी आहे.काही अपघात वाहन चालकांच्या बेजबाबदारपणामुळे होत असल्याचे दिसून येत आहे.अपघातांची संख्या शून्यावर आणण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री म्हणून यावेळी त्यांनी आश्वस्त केले.प्रत्येक व्यक्तीचा प्राण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे.राज्याच्या विकासाच्या दृष्टीने समृद्धी महामार्ग हा महत्त्वाचा प्रकल्प
0 Comments