Ticker

6/recent/ticker-posts

जाहीर निषेध जाहीर निषेध विविध संघटनेच्या महिला शक्ती रस्त्यावर


मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पार उद्ध्वस्त झाल्याचं आता समोर आलं आहे. कारण गेल्या दोन-अडीच महिण्यांपासून जातीय दंगलीनंतर  माणुसकीला लाज आणणारी घटना समोर आली आहे. इथं काही महिलांना विवस्त्र करत त्यांची रस्त्यावरुन धिंड काढण्यात आल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. दि. 4 मे रोजी मणिपूर राज्यात मैतई समाजातील समाजकंटकांकडून कुकी समाजातील आदिवासी महिलांची अत्याचार करून नग्नदिंड काढण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच देशभरातून संताप व्यक्त करण्यात आल्या.  
       खनिज संपत्ती चा मुबलक साठा असलेल्या मणिपूर राज्यात अडाणी अंबानी सारख्या देशद्रोही व्यापाऱ्यांचे भले करण्यासाठी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून जातीय दंगली पेटविण्याचे राजकारण करणाऱ्या मणिपूर सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात अत्यंत तीव्र शब्दात आज नवी मुंबईतील विविध राजकीय संघटना व महिला संघटनांनी वाशी येथील शिवाजी चौकात संताप व्यक्त करीत आरोपींना कठोर शिक्षा करावी ही मागणी करण्यात आली. 
    यावेळी प्रामुख्याने
समाजसेविका  रमाईच्या लेकी महिला विकास अभियानाच्या अध्यक्षा.व महिला विधवा विकास मंच राज्य सचिव . विविध आंदोलनाच्या प्रणेत्या रेवती आढाव नवी मुंबई,
 घर हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष हिरामण पगार, विनिता बाळीकुंद्रे, रिपब्लिकन सेना जिल्हाप्रमुख ख्वाजा मिया पटेल, नंदकुमार भालेराव, ऐरोली विधानसभा अध्यक्ष प्रकाश वानखेडे, बाबासाहेब संघारे, महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई इंगळे, दीपा बम, संगीता चौधरी, चांद पठाण, निला लिमये ताई, मीना ताई शेळके, सुशीला चाकुरकर ताई,माधवी सूर्यवंशी, विराज मोकल, पत्रकार कल्याण हनवते, सामाजिक कार्यकर्ते किशोर अवसरमोल , सतीश खंडाळे, वंचित बहुजन आघाडी, आरपीआय आठवले गट, स्त्री मुक्ती संघटना, महाराष्ट्र महिला परिषद, चेतना फाउंडेशन, अलर्ट इंडिया, म्युझिक अँड ड्रामा सर्कल, टाऊन लायब्ररी, परिसर सखी विकास संस्था, वी नीड यू, महा अं. नि. स., समता महिला मंडळ, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन, कामगार एकता युनियन, महाराष्ट्र महिला विकास मंडळ रमाईच्या लेकी महिला विकास मंडळ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, महिला अत्याचार विरोधी मंच. पेण.आदि संघटनांनी भर पावसात आवर्जून उपस्थिती तीव्र स्वरूपात जाहीर निषेध  .
नवी मुंबईतील विविध राजकीय संघटना व महिला संघटनांनी वाशी येथील शिवाजी चौकात संताप व्यक्त करीत जाहीर निषेध व्यक्त केला

Post a Comment

0 Comments