Ticker

6/recent/ticker-posts

समृद्धी महामार्गावर प्रवासच सुरक्षित नसेल तर मृत्युचा सामना कशाला ?

         
  "समृद्धी महामार्गावर नागरिकांनी बहिष्कार टाकण्याची गरज."             
      
कारंजा : बळीराजाच्या करोडो रुपयाच्या उपजाऊ शेतजमिनीचे अधिग्रहण करून,अनेक शेतकर्‍यांना भूमिहिन करणार्‍या, स्व.बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय समृद्धी महामार्गावर सुसाट व "अनियंत्रीत वेगाने गाड्या चालविण्याचा परवाना देणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्‌घाटन झाल्यापासूनच,दरदिवसा नव्हे तर प्रत्येक तासाला कोठेना कोठे तरी गंभिर अपघात झाल्याच्या घटना दररोज घडत असतांना शासन जागे कसे होत नाही.हाच महत्वाचा प्रश्न आहे."  महत्वाचे म्हणजे सुरुवातीपासूनच हा समृद्धी महामार्ग वाहनचालक व खुद्द प्रवाशांनाही आपल्याकडे संमोहीत करीत असल्यामुळे, प्रवाशी वाहने या समृद्धी महामार्गावर जात असतात.तर यामध्ये अनेक मंडळी उत्सुकता म्हणून हौसेखातर आपली वाहने समृद्धीवर टाकत असतात.व अतिवेगवान वाहन चालविण्याची सवय नसल्याने मृत्युच्या सापळ्यात अलगद अडकतात. या रस्त्यावर मध्यंतरी थांबायची व्यवस्थाच नसल्याने,क्षणाचाही विसावा न घेता व चहापाणी किंवा अल्पोपहार घेऊन ताजेतवाणे न होता वाहनचालक वाहने भरधाव वेगाने चालवीत असल्याने, वाहनचालक (ड्रायव्हर) याचे डोळे व मेंदू अक्षरशः केवळ सुसाट वेगात वाहन चालविण्याच मग्न झालेला असतो. म्हणजेच एक प्रकारे एवढा संमोहीत झालेला असतो की,आपले वाहन कोणत्या गतीने जात आहे याचे देखील त्याला भानच राहत नाही व त्याची मानसिकता बदलेली असते. त्यामुळे समृद्धी महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे या संकटातून मार्ग काढण्याकरीता महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक विभागाकडून वाहन तपासणी थांबे होणे.वाहनतळ होणे.अल्पशा विश्रांती करीता जागा, अल्पोपहार,चहापान,भोजन व्यवस्थे करीता हॉटेल, प्रत्येक 50 कि.मी.वर आपात्कालिन यंत्रणा, अग्निशामक,रूग्नवाहिका, रुग्नालय होणे गरजेचे आहे. आणि ही व्यवस्था जर शासन करू शकत नसेल तर समृद्धी महामार्गाचा प्रवासच सुरक्षित होऊ शकत नाही. त्यामुळे प्रवाशी वाहन धारकांनी या महामार्गावर बहिष्कार टाकणे गरजेचे आहे. प्रत्येक वाहनधारकांनी, एकसारखे वाहन चालवित राहणे टाळून,तास दोन तासानंतर विश्रांती घेऊन,ताजेतवाणे होण्याचा प्रयत्न केला.तर निश्चितच अपघाताच्या घटना टाळता येऊन,अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते.अशा चर्चा समाजमाध्यमांवर व्यक्त करण्यात येत असल्याचे आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे .

Post a Comment

0 Comments