Ticker

6/recent/ticker-posts

च्छता व पाण्याची गुणवत्ता राखा: किरण गणेश कोवे कार्यशाळेत उमेद अभियानातील सखींसोबत साधला संवाद


वाशीम:दि.19

“सध्या पावसाळा सुरु झाला असुन यादिवसात जलजन्य आजार वाढतात. यामुळे लहान मुलांना लवकर बाधा होते आ णि आरोग्यासह आर्थिक झळ पोहोचते. त्यामुळे स्वच्छता पाळा, पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवा आणि आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य सांभाळा.” या शब्दात ‍जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांनी ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या सखींसोबत संवाद साधला.


जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनानुसार वॉटर डॉट ऑर्गनायझेशन व उमेद  अभियानाच्या वतीने वॉश कार्यशाळेचे (‍दि.18) येथील व्यंकटेश हॉटेलच्या हॉलमध्ये आयोजन केले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन ‘डीआरडीए’ चे संचालक ‍किरण कोवे यांनी केले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे सहायक प्रकल्प संचालक सचिन गटलेवार, उमेद अभियानचे ‍जिल्हा अभियान व्यवस्थापक सुधीर खुजे, वॉटर डॉट ऑर्गनायझेशनचे जिल्हा समन्वयक उमेश आगरकर,विभागीय समन्वयक धीरज आणि स्वच्छ भारत मिशनचे जिल्हा मुल्यांकन व संनियंत्रण सल्लागार ‍विजय नागे यांची उपस्थिती होती.‍

वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण लोकांच्या पाणी, स्वच्छता आणि घरकुलाचा प्रश्न सोडवुन बचत गटाच्या माध्यमातुन ग्रामिण कुटुंबाची आर्थिक घडी बसवण्याची अतिशय महत्वाची जबाबदारी यशस्वीपणे पेलणारे जिल्हा ग्रामिण ‍विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत श्रोत्यांना प्रश्न विचारुन गावातील ज्वलंत समस्यांचा वेध घेतला आणि त्या समस्यांवर कशी मात करायची याचा कानमंत्रही दिला. घरकुलाच्या उमेद अभियानांतर्गत गावात कार्यरत बँक सखी, आरोग्य सखी, कृतीसंगम सखी यांसह बचत गटातील महिलांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.


Post a Comment

0 Comments