समाजभान जोपासणारे तीर्थक्षेत्र अनंत कोटी ब्रम्हांड नाही श्री गजानन महाराज यांच्या आशीर्वादाने कोंडोली येथे पितांबर महाराज यांनी सेवा कार्य केल्याची विदर्भात दिसून येत आहे.
तरुण तडफदार मनमिळाऊ कोंडोलीचे मूळ निवासी आणि उपमुख्यमंत्री कार्यालय मुंबई येथे अवर सचिव या पदावर कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष अमोल भाऊ पाटणकर यांनी मानोरा शहर आणि तालुयातील नागरिकांच्या सेवेत एक रुग्णवाहिका असावी यासाठी मोठे प्रयत्न केले. पाटणकर यांच्या प्रयत्नांना अखेर यश येऊन शहर आणि तालुयातील नागरिकांना वेळेवर जिल्हा अथवा महानगरांमध्ये पोहोचून आपले अमूल्य जीव वाचविता यावे यासाठी ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासनाकडून उपलब्ध असलेली रुग्णवाहिका आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपलब्ध होऊ शकत नसल्याने अपघातग्रस्त, गंभीर आजारी,श्वान, सर्पदंश, वन्य प्राण्यांचा हल्ला इत्यादी झालेले रुग्णांना अव्वाच्या सव्वा दराने कुठल्याही वैद्यकीय सोयी नसलेल्या खाजगी वाहनांद्वारे जीव धोयात घालून जिल्हा व महानगरांमध्ये जावे लागते.ज्यामध्ये बरीच जीवितहानी सुद्धा तालुयातील नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून सोसावी लागलेली आहे. उपरोक्त सर्व बाबींचा सारासार विचार करून अरुणावती बहुउद्देशीय संस्था, कोंडोली तथा वीर सावरकर सामाजिक प्रतिष्ठान मानोरा यांच्या संयुक्त प्रयत्नाने नागरिकांचा जीव वाचविणारा देवेंद्र फडणवीस आरोग्य दूत रुग्णांच्या सेवेत आजपासून दाखल होत आहे.
0 Comments