Ticker

6/recent/ticker-posts

पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकाविला!

     पेरलेले शेत गेले वाहून
         शेताची झाली नदी

अकोला प्रतिनीधी
बार्शिटाकळी तालुक्यात झालेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकविला असून, याचा सर्वाधिक फटका बार्शिटाकळी तालुक्यातील ग्राम खेर्डा खुर्द येथिल शेतकरी महादेव गावंडे या शेतकऱ्यांला बसला आहे. संततधार पावसामुळे शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. याशिवाय मूग आणि उडीद ही नगदी पिकेही हातून गेली आहेत.  या शेतक-याचे  ३० स्पिंकलर पाईप , दोन मोटार पंप स्टार्टर पाण्यात वाहुन गेले असुन शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थकारण या पिकांवरच अवलंबून आहे मागील आठवड्याभरात  तालुक्यात अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे चांगल्या स्थितीत उभे असलेले पीक जमीनदोस्त झाले. यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली असुन त्वरित पंपचामे करुन आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकरी मागणी करत आहेत.

Post a Comment

0 Comments