Ticker

6/recent/ticker-posts

वनोजा येथिल ग्रामस्थांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी; ग्राम प्रशासनाला निवेदन


मंगरुळपिर ता. प्र. दि. २७

तालुक्यातील आदर्श ग्राम वनोजा येथिल ग्रामस्थांना येत असलेल्या समस्या बाबत. ग्रामस्थांनी ग्राम प्रशासनला निवेदन दिले आहे. यामध्ये गावातील शिवाजी नगर मध्ये पाच दिवसापासुन, नळाद्वारे पाणी येत नाही. तसेच गावातील नवीन पाइपलाईनचे काम चालू आहे. त्यामुळे गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या फुटल्या आहेत. त्यामुळे घाण सांडपाणी पाणी रस्त्यावर येत असून, नागरिकांना जाता येताना त्यामुळे त्रास होत आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती करावी. सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळे, रस्त्याच्या कडेला गवत वाढले आहे. त्यावर फवारणी करणत यावी. तसेच अनेक दिवसापासून गावात धुळ फवारणी करण्यात आली नसून, डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावात धूळ फवारणी करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.

याप्रसंगी स्वप्नील चौधरी, धिरज राऊत, गौरव नंदकिशोर गावंडे, अनिकेत राऊत, सागर गावंडे, योगेश ठाकरे, आकाश गांजरे, गोपाल राऊत, गजानन राऊत, डिगा चौधरी, शिवा गावंडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments