वाशीम - वाहतूक नियमनासाठी गेल्या अनेक महिन्यापासून शहरातील प्रमुख चौकात उभारण्यात आलेले ट्रॅफीक सिग्नल त्वरीत सुरु करण्याच्या मागणीसाठी दिलेल्या इशार्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे यांच्या नेतृत्वात २८ ऑगष्ट रोजी नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन राबविण्यात आले. यावेळी शहरातील ट्रॅफीक सिग्नल येत्या आठ दिवसात सुरु करण्याचे आश्वासन मुख्याधिकार्यांनी दिल्यानंतर आंदोलन समाप्त करण्यात आले.
यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, शहरातील वाहतुक नियमनासाठी गेल्या अनेक महिन्याआधी लाखो रुपये खर्चून चौकांमध्ये ट्रॅफीक सिग्नल व खांब बसविण्यात आले आहेत. मात्र हे सिग्नल अद्यापही सुरु न झाल्यामुळे जागोजागीचे खांब जर्जर होवून कोसळण्याच्या स्थितीत आहेत. या प्रकारामुळे शासनाच्या पर्यायाने जनतेच्या लाखो रुपयाचा निधी पाण्यात जात आहे. त्यामुळे सदर ट्रॅफीक सिग्नल सुरु करण्याची मनसे वाहतूक सेनेची मागणी आहे. शहरातील प्रमुख चौकात बसविलेले हे खांब अनेक ठिकाणी तुटलेले असून पावसामुळे जंगुन गेले आहेत. त्यामुळे शासनाचा या कामासाठीचा लाखो रुपयाचा निधी पाण्यात जात आहे. यासंदर्भात पक्षाने वेळोवेळी दिलेल्या निवेदनावर कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. नगर परिषद प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार आठ दिवसात ट्रॅफीक सिग्नल सुरु करावे, अन्यथा पुन्हा आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात मनसे महिला सेना जिल्हाध्यक्ष सिता धंदरे, वाहतूक सेना शहराध्यक्ष उमेश टोलमारे, मनसे सैनिक आबा सोनटक्के, प्रमिला इंगळे, रेखाताई, मनसे सैनिक बबलू गायकवाड, प्रशांत खैरे, रोहीत तुपसौंदर, ऋतिकेश कांबळे, गणेश कांबळे, ज्ञानेश्वर रणबावळे, वैभव बदर, सौरभ तुपसोैंदर, मोहन तुपसौंदर, करण खडसे, प्रथमेश रणबावळे, शुभम गवळी, राहुल इंगळे, नागेश गायकवाड, नरेश हनवते आदींनी सहभाग घेतला.
0 Comments