Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हयाच्या सर्व पोलीस स्टेशनमधील भंगार व नादुरुस्त वाहने बदलामहाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन


वाशीम - नुकतेच भर रस्त्यावर एका पोलीस वाहनाचे चाक निघाल्याच्या पार्श्वभूमिवर जिल्हयातील सहाही तालुयातील शहरी तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनमधील भंगार, नादुरुस्त व सेवा समाप्त झालेली वाहने बंद करुन त्या जागी पोलीसांना नविन वाहने देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने केली आहे. वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे यांच्या नेतृत्वात सोमवार, २८ ऑगष्ट रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्यामार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, २७ ऑगष्ट रोजी पोलीस विभागाचे चारचाकी वाहनााचे चाक शहरातील सिव्हील लाईन भागात निखळून वेगळे झाले होते. सुदैवाने यामुळे पोलीस बांधवांना किवा नागरीकांना जिवित हानी झाली नाही. मात्र यामुळे पोलीस विभागातील भंगार, नादुरुस्त व सेवा समाप्त झालेल्या वाहनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस विभागाला नेहमी जनतेच्या रक्षणासाठी सर्तक राहावे लागते. मात्र संकटाच्या वेळी वाहने नादुरुस्त झाल्यास जनतेच्या रक्षणाला पोलीस बांधव वेळेवर जाणार कसे? हा प्रश्न निर्माण झाला असून या नादुरुस्त वाहनामुळे पोलीसांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. ही बाब पाहता वाशीम, कारंजा, मानोरा, मंगरुळपीर, रिसोड आणि मालेगाव या ठिकाणच्या शहरी व ग्रामीण पोलीस स्टेशनसह एल.सी.बी., वाहतूक शाखा आदी ठिकाणची भंगार, नादुरुस्त आणि सेवा समाप्त झालेली वाहने त्वरीत बंद करुन त्या जागी पोलीसांना नवीन वाहने देण्यात यावी अशी मागणी वाहतूक सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदन देतांना मनसे जिल्हाध्यक्ष राजू किडसे पाटील, शहराध्यक्ष रवि वानखेडे, कामगार कार्यकारणी सदस्य ओमप्रकाश फड, वाहतूक सेना शहराध्यक्ष उमेश टोलमारे व मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments