दिः २०/९/२०२३ रोजी मातोश्री स्वर्गीय कोकीळाबाई ठाकरे पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय मंगरूळपीर येथे विद्यार्थ्यांकरिता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला ग्रामीण रुग्णालय मंगरूळपीर येथील अधिक्षक श्री. श्रीकांत जाधव आणि आरोग्य विभागातील डाँक्टर, कर्मचारी उपस्थित होते .
प्रारंभी मातोश्री स्वर्गीय कोकीळाबाई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. श्रीकांत जाधव यांच्या हस्ते पुष्प माला अर्पण करून अभिवादन करण्यात आले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सूर्यकांत कान्हेरकर आणि मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासोळा,संस्थेचे कोषाध्यक्ष श्री दिलीपराव ठाकरे,श्री. बाबुरावजी नरळे,श्री. सुधीर देशमुख, ग्रामीण रुग्णालय मंगरूळपीर येथील वैद्यकीय चमू, महाविद्यालयातील प्राध्यापक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय कावरे यांनी केले, तर या आरोग्य शिबीराला यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. कान्हेरकर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. साहेबराव गावंडे, प्रा.संजय कावरे , प्रा.मंगेश आखरे, प्रा.जितेंद्र सुर्वे, प्रा.निखिल भगत, प्रा. कु भाविकां कडू, प्रा. प्रवीण अलोने, प्रा.भारत दोडेवार, प्रा. वकील खान, प्रा. कांबळे यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी यांनी मातोश्री स्व.कोकिळाबाई ठाकरे यांना सामुदायिक श्रद्धांजली वाहिली.
कार्यक्रमात त्यानंतर आरोग्य विभागातील चमूंनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. या आरोग्य तपासणी शिबिरात कनिष्ठ महाविद्यालयातील ३६० विद्यार्थ्यांनी आरोग्याची तपासणी केली. या उपक्रमासाठी संस्थेचे सचिव माननीय चंद्रकांत दादा ठाकरे आणि संस्थेचे अध्यक्ष सुभाषरावजी ठाकरे यांनी यांनी मार्गदर्शन केले होते. विद्यार्थ्यांनी भरीव उपस्थिती दाखवून या आरोग्य शिबिराला यशस्वी केले. वैद्यकीय चमूंनी विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या /अडचणी जाणून घेऊन त्यांना त्याप्रमाणे मोफत औषध उपचार करण्यात आला. वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुद्धा स्वयंप्रेरणेनेने या आरोग्य शिबिरात आरोग्य तपासणी केली. या आरोग्यविषयक शिबिरासाठी डॉ. प्रीती तिडके, डॉ. आडे , डॉ. झाडे श्री. डॉ.खाडे, डॉ. भगत, श्री.प्रकाशजी संगत या आरोग्य चमूंनी बहुमोल सहकार्य केले .त्याबद्दल
महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. सूर्यकांत कान्हेरकर यांनी आरोग्य अधिकारी / अधीक्षक डॉ. श्रीकांत जाधव यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच श्री प्रकाशजी संगत यांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक , कर्मचारी वृंद बहुसंख्येने उपस्थित होते,श्री बाबुरावजी नरळे, श्री.सुधीर देशमुख उपस्थित होते या कार्यक्रमाच्या शेवटी सर्व वैद्यकीय चमूंना फराळ,चहापान देउन आभार व्यक्त करण्यात आले.
0 Comments