श्री धानोरकर आदर्श विद्यालय येथे जागतिक आत्महत्या प्रतिबंध सप्ताह 10 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय वाशिम यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आला त्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष
संस्थेचे सचिव तथा प्राचार्य श्री मंगेश भाऊ धानोरकर यांनी स्वीकारले तर प्रमुख अतिथींचे स्थान डॉक्टर श्वेता मोरवाल ठाकूर( मानसोपचार तज्ञ),राहुल कसादे( मनोविकृती ब्रदर ) सुनील सुर्वे (मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता) तथा प्राध्यापक भोयर सर यांनी स्वीकारले
आत्महत्या ही जागतिक समस्या असून ती संपूर्ण जगाला भेडसावत असून मानसिक ताणतणाव यातून आत्महत्या चे प्रमाण वाढत असून याला कुठेतरी आळा बसायला हवा त्याकरिता संपूर्ण भारतामध्ये आत्महत्या प्रतिबंध सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त डॉक्टर श्वेता मोरवाल ठाकूर (मानसोपचार तज्ञ )यांनी विद्यालयांमध्ये येऊन विद्यार्थ्यांना आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना सुचविल्या, मानसिक आजाराची या ठिकाणी विविध जसे झोप न लागणे,छातीमध्ये धडधड करणे, याविषयी संवाद साधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
तर राहुल कसादे (मनोविकृती ब्रदर) यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्या वाढण्याची कारणे जाणून घेऊन विद्यार्थ्यांना सुद्धा बहुमोल असे मोलाचे मार्गदर्शन दिले तसेच, सुनील सुर्वे, (मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता), यांनी भावनिक आरोग्य सुदृढ कसे ठेवायचे याचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांची हितगुज केली शेवटी अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेचे सचिव तथा प्राचार्य श्री मंगेश भाऊ धानोकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा अतिवापर,ताण तणाव वाढून विद्यार्थी आत्महत्याग्रस्त होत आहेत ही कारणे सुचविली व विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळावे तसेच नियमित व्यायाम करून आपले भावनिकआरोग्य कसे सुदृढ राहील यावर मार्गदर्शन केले
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विद्यार्थी तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक श्री नागे सर, श्री पाटील सर, गुल्हाने सर, श्री नंदनकर सर, श्री जाधव सर,श्री यवतकर सर , विद्यालयातील सर्व शिक्षक सौ धानोरकर मॅडम श्री उचित सर श्री पाटील सर श्री वैभव सर सौ होले मॅडम श्री झळके सर श्री सावके सर श्री ढेंगळे सर तथा शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेतील सर्व कर्मचारी यांनीही सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला
या कार्यक्रमा चें संचालनश्री वैभव सर यांनी केले तर आभार श्री ढेंगळे सर यांनी मानले
0 Comments