Ticker

6/recent/ticker-posts

रिसोड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘पिएम रन स्किल’ मॅराथॉन स्पर्धा


दिक्षांत सोहळा उत्साहात : गुणवंतांचा सत्कार

रिसोड (प्रतिनिधी) - येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रविवार, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ‘पिएम रन स्किल’ मॅराथॉन स्पर्धा व दिक्षांत समारंभ सोहळा तसेच गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य जी.पी. मसराम तर प्रमुख पाहूणे म्हणून संस्थेचे आयएमसी सदस्य पंजाबराव देशमुख व पुष्पाताई महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक गोळे सर उपस्थित होते.
मॅरॉथॉन स्पर्धेचे उद्घाटन पंजाबराव देशमुख यांचे हस्ते पार पडले. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग घेतला. या स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक सुरेश कोरडे, व्दितीय उमेश कोळकर, तृतीय आदित्य सरनाईक तर महिला गटात प्रथम क्रमांक कु. कोमल राईतकर, व्दितीय कु. गायत्री देशमुख व तृतीय कु. निकीता वाढोरे हिने पटकावला. विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस, ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देण्यात आले. त्यानंतर संस्थेत दिक्षांत समारंभ कार्यक्रम पार पडला. संस्थेत जुलै २०२३ मध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय व्यवसाय परिक्षेत फिटर, वायरमन, वेेल्डर, प्लंबर, ड्रेसमेकींग या विषयामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते ट्रॅाफी देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडाशिक्षक गोळे सर, समन्वयक भगतसर, खिल्लारेसर, सौ. महाळंकर मॅडम, सरोदे सर, इंगोलेसर, देशमुखसर, अंभोरेसर व ठाकरे सर यांचे महत्वपुर्ण योगदान लाभले.

Post a Comment

0 Comments