कारंजा ( प्रतिनिधी संजय कडोळे)
: स्थानिक शहर पोलीस स्टेशनच्या आवारात,संत गजानन महाराज यांचे कारंजा शहरातील पहिले आणि प्राचिन असे मंदिर असून,सदर मंदिर हे संत गजानन महाराजांचे जागृत स्थान म्हणूनही ओळखले जाते.शिवाय संत गजानन महाराजांना येथील मंदिरात जाऊन केलेला नमस्कार, श्रीक्षेत्र शेगाव नगरीतील संत गजानन महाराजांच्या समाधी स्थळांपर्यत पोहोचतो.असी भाविकांची श्रद्धा असून, महाराजांसमोर दोन क्षण डोळे मिटून नामस्मरण केले असता शेगाव नगरीतील महाराजांचे समाधी मंदिरातच उभे असल्याचा आभास होतो.त्यामुळे सदर मंदिरात रात्रंदिवस वारकरी आणि भाविक महिला पुरुषांची वर्दळ रहात असते.शिवाय दर गुरुवारी कारंजा शहरातील श्री.भक्तांकडून स्वेच्छेने भंडारा (महाप्रसाद) केल्या जातो.श्रींच्या भंडारा (महाप्रसादाकरिता) कोणीही येथे देणगी मागीत नाहीत.मात्र श्रींचे वारकरी आणि भक्तगण स्वेच्छेने सामुहिक महाप्रसादाची व्यवस्था करतात.शिवाय दरवर्षी ऋषीपंचमीला (श्रींच्या पुण्यतीथि) आणि श्रींच्या प्रगटदिनाला मोठा आनंदोत्सव साजरा केला जातो.तसेच आणखी एक वैशिष्ट म्हणजे येथील सेवेकरी रात्रंदिवस निष्काम सेवा देत असतात.मंदिराचा पारदर्शी व्यवहार असून, उत्सवाकरीता लेखा जोखा अगदी चोख ठेवला जातो.सेवेकरी स्वयंस्फूर्तीने निःस्वार्थ सेवा देतात.मंदिरात श्रीक्षेत्र शेगाव संस्थान प्रमाणे स्वच्छता ठेवली जाते.आणि वेळापत्रकाप्रमाणे दैनंदिन कार्यक्रम व आरती पार पाडल्या जाते.सध्या येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापक हरिभक्त सुरेशरावजी ठाकरे गुरुजी आणि हरिभक्त गजाननरावजी कडू हे निःस्वार्थ पणे जबाबदारी सांभाळीत असून,हरिभक्त नवघरे काका सेवक म्हणून सेवा देत आहेत.त्यांचेशिवाय इतरही भाविक सेवारत असल्याने श्रींच्या मंदिराचा नावलौकीक वाढतच आहे.
भाद्रपद ऋषी पंचमी,श्री संत गजानन महाराजांची पुण्यतिथी असल्याने, श्रींच्या भाविकांकडून बुधवार दि.20 सप्टेंबर 2023 रोजी,प्रातःकाली श्रींचा महाभिषेक,होमहवन, दैनंदिन कार्यक्रम,सकाळी 11:00 वाजता महाआरती व त्यानंतर, महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम पार पडला.यावेळी शहरातील स्वयसेवकांनी स्वयंस्फूर्तीने सेवा दिली.पंचक्रोशीतील हजारोंनी प्रसादाचा लाभ घेतला.असे वृत्त श्री.भक्तांकडून मिळाले आहे.
0 Comments