समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक रस्त्यावर तलवारीने केक कापून समाजात दहशत पसरविण्याच्या प्रयत्नातील युवकाकडून एक तलवार जप्त करण्यात आली असून सदर युवकावर पो.स्टे.वाशिम शहर येथे शस्त्र अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
दि.१५.०९.२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी/अंमलदार यांना गुप्त बातमीदाराकडून महात्मा फुले चौक, वाशिम येथे सार्वजनिक रस्त्यावर एका युवकाने तलवारीने केक कापून त्याचा व्हिडीओ काढून तो समाजमाध्यमांवर अपलोड करून शांतता व सुव्यस्था बिघडवून दहशत माजविली आहे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यावरून सदर व्हिडीओमधील युवकाची माहिती घेतली असता सदर युवक हा अजय भरत भालेराव, वय २१ वर्षे, रा.महात्मा फुले चौक, वाशिम हा असल्याचे समजले. त्यास ताब्यात घेऊन पंचासमक्ष सदर युवकाच्या ताब्यातून ताल रंगाचे कापड असलेल्या लाकडी म्यान मध्ये असलेली धारदार तलवार जप्त करण्यात आली असून सदर युवकावर पो.स्टे.वाशिम शहर येथे कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
सदरच्या कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.रामकृष्ण महल्ले यांच्या नैतृत्वाखाली सपोनि.रमाकांत खंदारे व पोलीस अंमलदार प्रशांत राजगुरू, ज्ञानदेव मात्रे, महेश वानखेडे व विठ्ठल महाले यांनी पार पाडली. नागरिकांनी सुजाण नागरिक या नात्याने अवैध शस्त्र धारकांची माहिती पोलीस नियंत्रण कक्ष, वाशिम किंवा DIAL ११२ ला द्यावी, त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
( जनसंपर्क अधिकारी )
पोलीस अधिक्षक कार्यालय, वाशिम.
0 Comments