Ticker

6/recent/ticker-posts

सुरभी जाजू राठी यांना ज्ञानगंगा पुरस्कार प्रदान

मंगरूळपीर-लेखन क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मंगरूळपीर येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण महाविद्यालय येथील द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी 
   विन फाउंडेशनचे संस्थापक डॉ. विना त्यागराज तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राधिका पाटील सुप्रसिद्ध मराठी कलाकार, तेजस्विनी कांबळे सुप्रसिद्ध भरतनाट्यम गुरु, डॉ. मारुती भंडारी ज्योतिष शास्त्रज्ञ तसेच संस्था  पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मानपत्र, गौरव पदक, सन्मानाचिन्ह, श्रीफळ, पुष्पमाला आणि महावस्त्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. यांनी लहान वयातच लेखनाचा छंद जोपासला असून त्यांनी Essential of English Grammar K.G. to P.G. Published By BlueRoseOne  Publication, Noida हे 400 पेजेस च्यl पुस्तकlचे लेखन कार्य पूर्ण केले व त्यांची ही पुस्तक Amazon,Flipcard  येथे पण ऑनलाईन उपलब्ध आहे व या पुस्तकाचे लेखन कार्याला प्रोत्साहन देण्याकरिता त्यांना ज्ञानगंगा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
   सुरभी जाजू राठी यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील ,भाऊ तसेच सासू-सासरे ,पती आणि परिवारातील अन्य सदस्यांना दिले तसेच संस्थेचे सचिव चंद्रकांत दादा ठाकरे, प्राचार्य डॉ.झिमटे सर, प्राध्यापक वृद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिले .त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments