बॅरेजचे मंजुरीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचेसुध्दा विशेष प्रयत्न
मंगरुळपीर ता 08:तालुक्यातील घोटा, शिवणी, बोरव्हा, या अडाण नदीवर पैनगंगा नदीवरील बॅरेजच्या धर्तीवर शेतकऱ्यांच्या सिंचन सुविधेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील संकल्पनेतुन बॅरेजेस व्हावीत या करीता जिल्हयाचे तत्कालीन पालकमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी मा. तत्कालीन जलसंपदा मंत्री मा. अजितदादा पवार यांनी २०२ द.ल.घ.मी. पाणी उपलब्ध करुन दिल्यानंतर जिल्हयात अनेक सिंचनाची छोटी मोठी प्रकल्प पुर्णत्वास गेली आहे. त्यास संकल्पनेतुन अडाण नदीवर सुध्दा बॅरेजस व्हावेत यां मुळ संकल्पनेतुन सन २००७ साली या प्रकल्पाची मुर्हतमेढ करुन सुरुवात करण्यात आली होती. सदर प्रकल्पास २००९ या वर्षी तत्वता मान्यता देण्यात आल्यानुसार अनेक तांत्रिक अडचणीमुळे सदर मान्यता व्यपगत झाली होती त्यानुसार नव्याने सदर प्रकल्पास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्यात आला होता.
सदर बॅरेजेसच्या कामास मान्यता देण्याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री व उप मुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच उप मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची वारंवार भेट घेवुन वरील बाबतीत शासन स्तरावर विविध बैठकीमधुन हा प्रश्न मार्गी लागावा या संदर्भात मागणी लावून धरली होती त्यानुसार ठाकरे यांच्या मागणीची दखल घेवुन उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विद्यमान जलसंपदा मंत्री तथा उप मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयातुन सदर कामास ०८ नोव्हेंबर रोजीच्या झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये घोटा, शिवणी व बोरव्हा या शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या बॅरेजसला मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये एकुण घोटा शिवणी बॅरेजेसच्या सिंचनातुन १३९४ हेक्टर जमिनीस सिंचनाचा लाभ होणार असुन बोरव्हा बॅरेजेस मधुन ९०० हेक्टर जमिनीस सिंचनाचा लाभ होणार आहे. करीता घोटा शिवणी करीता ३४०.०० हेक्टर तसेच बोरव्हा बॅरेजेस करीता २६०.०० हेक्टर जमिन संपादित करण्यात येणार असुन घोटा शिवणी बॅरेजेस करीता २३४.१३ लक्ष व बोरव्हा बॅरेज करीता १६२.४३ लक्ष रुपये खर्च अपेक्षीत आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील शेतकऱ्यांकडुन महायुती शासनाचे व जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी सदर बॅरेजसाठी विशेष प्रयत्न केल्यामुळे वरील परीसरातील कास्तकाराच्या वतीने सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
0 Comments