Ticker

6/recent/ticker-posts

प्रहार जनशक्ती पक्षातर्फे पी. एम. स्वनिधी योजना शिबिराचे आयोजन.

वार्ताहर : 
अनंतराज गायकवाड

नुकतेच प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने
पी एम.स्वनिधी योजना शिबीर आयोजित करण्यात आले होते.
माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली एस बी.आय बँकेच्या स्थानिक शाखेत लाभार्थ्यांना बचत खाते सुरू करून देण्यात आले. तसेच पी एम स्वनिधी लोन चे फॉर्म लाभार्थ्यांना भरून देण्यात आले.

निलेश अलिमकर चाळ या शिळ- दिवा रोड, पो. पडले, ता.जि. ठाणे येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. 

याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष आदित्य चिकटे, दिवा प्रभाग समिती अध्यक्ष विश्वास फुरडे, सुरज वायडा, संगम गुप्ता, अष्टशील सावंत, साक्षी भालेराव, एस बी.आय.बँक चे श्याम प्रजापती. पी.एम. स्वनिधी लोन चे साक्षी कदम आदींसह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

भविष्यात प्रहार जनशक्ती पक्षातर्फे असेच लोकोपयोगी शिबिर आयोजित केले जातील असा विश्वास कार्यक्रमाचे आयोजक आदित्य चिकटे यांनी व्यक्त केला. या सकारात्मक उपक्रमामुळे लाभार्थ्यांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.

Post a Comment

0 Comments