Ticker

6/recent/ticker-posts

प्राध्यापक सुषमा जाजू यांना महालक्ष्मी पद्म पुरस्कार प्रदान

मंगरूळपीर-सामाजिक व शैक्षणिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या मंगरूळपीर येथील यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ. सुषमा जाजू यांना नुकताच विन फाउंडेशन मुंबई आणि महालक्ष्मी शिक्षण ट्रस्ट
 यांच्या संयुक्त विद्यमाने पटवर्धन सभागृह ,सदाशिव पेठ, पुणे येथे महालक्ष्मी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
       विन फाउंडेशनचे संस्थापक डॉ. विना त्यागराज तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राधिका पाटील सुप्रसिद्ध मराठी कलाकार ,तेजस्विनी कांबळे सुप्रसिद्ध भरत नाट्यम गुरु, डॉ. मारुती भंडारी ज्योतिष शास्त्रज्ञ तसेच संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मानपत्र ,गौरव पदक ,सन्मानचिन्ह, श्रीफळ ,पुष्पमाला आणि महावस्त्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. प्राध्यापक सुषमा जाजु यांना यापूर्वी अखिल भारतीय प्रतिभारत्न पुरस्कार मुंबई ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार इंदोर ,धर्मराज पुरस्कार कारंजा ,देवदूत पुरस्कार रिसोड ,राष्ट्रीय  एकात्मिक फेलोशिप मुंबई,श्रीकांत जिचकर पुरस्कार, लोकमत सखी सन्मान पुरस्कार, अहिल्याबाई होळकर पुरस्कार, अमरावती असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. प्राध्यापक जाजू यांनी आपल्या यशाचे श्रेय आई, पती तसेच संस्थेचे सचिव चंद्रकांत दादा ठाकरे ,प्राचार्य डॉ. कान्हेरकर  प्राध्यापक वृद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिले .त्यांच्या या यशा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments