आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रुग्णसेवा खोळंबली, तरी प्रशासनाला जाग आली नाही या प्रकरणाकडे प्रशासन पाठ तर फिरवणार नाही ना अशी चर्चा जनसामान्यात जोर धरत आहे
ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २८ पासून बेमुदत संप पुकारला असून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी (आयुष) वैधकिय अधिकारी व कर्मचारी हे दिनांक २८ पासून बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २८ ऑक्टोबरपासून संपूर्ण राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरु आहे. सदर आंदोलन बेमुदत असून या संपाबाबत आयुक्त, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई व मंत्री, आरोग्य विभाग यांना पूर्वसूचना दिलेल्या आहे. त्यानुसार सर्व वैधकिय अधिकारी ग व कर्मचारी संपात सहभागी होत आंदोलनाच्या काळात स्वर्गीय सुनीता पवार आरोग्य सेविका यांना भावपूर्वक श्रद्धांजली सुद्धा देण्यात आली. यावेळी डॉ. सय्यद अजमल, डॉ. प्रीती तिडके, डॉ. विनोद इंगळे, डॉ. पल्लवी गोटे , डॉ. वैशाली महाकाळ, डॉ. चाटशे ,सीमा कांबळे
,महेश बारगजे ,स्वाती राऊत ,पूनम नाकट, नम्रता जोशी , प्रियंका सुर्वे ,
सुषमा बिकट , शिल्पा तायडे , ममता कोटे , सुवर्णा पाटील ,किरण भगत,
अविनाश अवसारे, आदींची उपस्थिती होती. अधिकारी, कर्मचारी संपात सहभागी झाल्याने ग्रामीण रुग्णालयात रुग्णसेवा प्रभावि झाली आहे.
0 Comments